पणजी : पालिका निकाल : काँग्रेसचे धर्मेश सगलानी साखळी पालिकेमध्ये पराभूत

काँग्रेसचे रमेश सलगामी पराभूत
काँग्रेसचे रमेश सलगामी पराभूत

पणजी : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या साखळी आणि फोंडा पालिकेचे निकाल आज (रविवार) सकाळपासून जाहीर होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे साखळी मतदारसंघाचे दोन वेळचे काँग्रेसचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी हे साखळी पालिकेमध्ये पराभूत झाले आहेत. रश्मी देसाई यांनी त्यांचा प्रभाग ४ मधून पराभव केला आहे.

त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा आणि महिला काँग्रेसच्या नेत्या असलेल्या सुनिता वेरेकर या पराभूत झाल्या असून, सिद्धी परब यांनी त्यांचा प्रभाग ३ मधून पराभव केला आहे. इतर प्रभागातही भाजप समर्थक उमेदवार पुढे आहेत. अशा रीतीने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी पालिकेवर पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे.

तर दुसरीकडे फोंडा पालिकेमध्ये माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषिमंत्री रवी नाईक यांच्या भाजप समर्थक गटाने वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे दोन्ही पुत्र रितेश नाईक व रॉय नाईक हे निवडून आलेले आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष समर्थक पॅनलची सत्ता स्थापन होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news