India vs Pakistan Live Update : पाकिस्तानचा भारतावर ५ गडी राखून दणदणीत विजय

India vs Pakistan Live Update : पाकिस्तानचा भारतावर ५ गडी राखून दणदणीत विजय
Published on
Updated on

दुबई; पुढारी ऑनलाईन : आशिया चषकातील सुपर ४ च्या सामन्यात भारताने माजी कर्णधार विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला १८२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या (४४ चेंडूत ६० धावा) बळावर भारताला ७ बाद १८१ धावांचा टप्पा गाठता आला. भारताच्या फलंदाजांनी सुरुवाती पासून मोठे फटके मारत रनरेट चांगला ठेवला. १२ षटकानंतर विकेट्स गमावल्याने भारत थोडा अडखळताना दिसला. पण, विराट कोहली आणि दीपक हुडा यांनी अखेरच्या षटकात केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने आव्हानात्मक ७ बाद १८१ स्कोर उभा केला.

पाकिस्तानचे निमंत्रण स्विकारत भारताच्या सलामीवीरांनी पहिल्या ५ षटकांमध्ये ५४ धावांची नाबाद सलामी दिली. यानंतर दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहूल प्रत्येकी २८ धांवाची खेळी करत बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यांन काही काळ डाव सांभाळला. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात सुर्यकुमार १३ धावांवर बाद झाला. यांनतर पंतला सोबत घेत कोहली याने ११ व्या षटकात संघाच्या १०० धावा फलकावर लावल्या. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत १४ धावांवर बाद झाला. त्याच्या नंतर आलेल्या हार्दीक पंड्या देखिल आल्या आल्या माघारी परतला. तो मिडऑनला झेल देत शुन्यावर बाद झाला.

Live Update : India vs Pakistan

PAK 156/4 (18)

  • पाकिस्तानचा भारतावर ५ गडी राखून दणदणीत विजय
  • पाकिस्तानला पाचवा धक्का, असिफ अली बाद
  • पाकिस्तानला विजयासाठी ६ चेंडूत ७ धावांचे आव्हान
  • पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत २६ धावांचे आव्हान
  • पाकिस्तानच्या १५० धावा पुर्ण
  • सामन्यात मोठा ट्वीस्ट; अडथळा ठरलेला रिझवान तंबूत परतला
  • १६ षटकानंतर पाकिस्तानने केल्या ३ बाद १३९ धावा
  • पाकिस्तानला तिसरा धक्का, मोहम्मद नवाज बाद
  • भारता विरुद्ध १५ षटकानंतर पाकिस्तानने केल्या २ बाद १३५
  • भारता विरुद्ध पाकिस्तानची सामन्यावर मजबूत पकड ३६ चेंडत ६३ धावांची आवश्यकता
  • १२.४ षटकात पाकिस्तानने पार केली शंभरी
  • पाकिस्तानच्या रिझवानने झळकावले अर्धशतक, ३८ चेंडूत केल्या ५१ धावा
  • 12 षटकानंतर पाकिस्तान पोहचला ९६ धावांवर गमावल्या २ विकेट्स
  • भारता विरुद्ध पाकिस्तानने १० षटकात बनवल्या २ बाद ७६ धावा
  • युझवेंद्र चहलने दिला पाकिस्तानला झटका; फकर जमान बाद
  • पाकिस्तानने ८ षटकानंतर बनवल्या १ बाद ५७ धावा
  • पाकिस्तानने धावफलकावर झळकावल्या १ बाद ५० धावा
  • पाकिस्तानने पॉवर प्ले मध्ये केल्या १ बाद ४४ धावा
  • पाच षटकात पाकिस्तानने बनवल्या १ बाद ३६ धावा
  • रवी बिश्नोईने घेतली बाबर आझमची विकेट, बाबरने केल्या १० चेंडूत १४ धावा
  • भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का; बाबर आझम परतला माघारी
  • ३ षटकानंतर पाकिस्तानने केल्या १९ धावा
  • दुसऱ्या षटकात पाकिस्तानने घेतल्या फक्त २ धावा. बनवल्या नाबाद ११ धावा
  • पहिल्या षटकानंतर पाकिस्तानच्या ९ धावा

IND 182/7 (20)

  • भारताचे पाकिस्तानसमोर १८२ धावांचे आ्व्हान
  • विराट कोहली ५९ धावांवर बाद
  • १९ षटकानंतर भारताने बनवल्या ६ बाद १७१ धावा
  • दीपक हुड्डा १४ चेंडूमध्ये १६ धावा करीत बाद
  • १८ षटकानंतर भारताने बनवल्या ५ बाद १64 धावा,
  • १७ षटकानंतर भारताने बनवल्या ५ बाद १४८ धावा,
  • भारताने १५ षटकानंतर बनवल्या ५ बाद १३५ धावा
  • भारताने गमावली हार्दीक पंड्याची विकेट
  • भारताने गमावली पंतची विकेट; ४ बाद १२६ धावा
  • १३ षटकानंतर भारताने बनवल्या ११८ धाव.
  • १२ षटकानंतर भारताने बनवल्या १०५ धाव.
  • ११ षटकानंतर भारताने बनवल्या १०१ धाव. विराट २३ धावांवर तर पंत २ धावांवर खेळत आहे.
  • १० षटकानंतर भारताने बनवल्या ३ बाद ९३ धावा.
  • पाकिस्तान विरुद्ध भारताला बसला तिसरा धक्का; सुर्यकुमार १३ धावांवर बाद
  • ९ षटकानंतर भारताने केल्या २ बाद ८८ धावा.
  • ७ षटकानंतर भारताने केल्या २ बाद ७१ धावा. सुयर्यकुमार यादव, विराट काोहली मैदानात
  • भारताचा दुसरा सलामीवीर केएल राहूल माघारी परतला आहे. केएल राहुल २० चेंडूत २८ धावांची खेळी केली.
  • ६ षटकानंतर पॉवर प्लेमध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध १ बाद ६२ धावा केल्या आहे. मैदानावर केएल राहुल आणि विराट कोहली खेळत आहेत.
  • कर्णधार रोहित शर्मा याने १६ चेंडूत २८ धावा केल्या. त्याने या खेळीत २ षटकार आणि ३ चौकार मारले
  • पाकिस्तान विरुद्ध भारताला बसला पहिला झटका; रोहित शर्मा २८ धावांवर बाद
  • ५ षटकात भारताने केल्या नाबाद ५४ धावा
  • ४ षटकानंतर भारताने बनवल्या नाबाद ४६ धावा
  • भारताच्या सलामीवीरांची वादळी खेळी सुरुच ३ षटकात बनवल्या नाबाद ३४ धावा
  • २ षटकानंतर भारताने केल्या नाबाद २० धावा
  • पाकिस्तान विरुद्ध भारताने पहिल्या षटकात बनवल्या नाबाद ११ धावा, रोहित शर्माने या षटकात एक चौकार आणि एक उत्तंग षटकार ठोकला.

भारताचा संघ (Asia Cup 2022)
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दीक पंड्या, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, भूवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फकर जमान, इफ्तीकार अहमद, खुर्शिद शाह, शादाब खान, असिफ अली, मोहम्मद नवाज, हारिश राऊफ, हसन अली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news