पाकिस्‍तान लष्‍कराकडून माझ्‍या पत्‍नीवर विषप्रयोग : इम्रान खान यांचा खळबळजनक आरोप

माझी पत्नी बुशरा बीबी यांच्‍याबर विषप्रयोग झाल्‍याचा खळबळजनक आरोप पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
माझी पत्नी बुशरा बीबी यांच्‍याबर विषप्रयोग झाल्‍याचा खळबळजनक आरोप पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माझी पत्नी बुशरा बीबी यांना खाजगी निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्‍यांच्‍यावर विषप्रयोग झाला आहे, असा खळबळजनक आरोप करत माझ्‍या पत्‍नीच्‍या जीविताला काही झाल्‍यास पाकिस्‍तानचे लष्कर प्रमुख जबाबदार असतील, असा दावा पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश नासिर जावेद राणा यांच्‍या समोर केला.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान अदियाला तुरुंगात तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश नासिर जावेद राणा यांना सांगितले की त्यांची पत्नी बुशराला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामागे कोणाचा हात आहे हे मला माहीत आहे, असेही इम्रान खान म्हणाले.

पुन्हा वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे – इम्रान खान

इम्रान खान म्हणाले की, बुशरा यांच्‍या जीविताचे काही नुकसान झाल्यास, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना जबाबदार धरले पाहिजे. कारण एका गुप्तचर संस्थेचे सदस्य त्यांच्या इस्लामाबादमधील बनी गाला निवासस्थान आणि रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात सर्वकाही नियंत्रित करत होते. शौकत खानम रुग्णालयाचे डॉ. असीम यांनी बुशराची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती इम्रान खान यांनी न्यायालयाला केली आहे. यापूर्वी तपासलेल्या डॉक्टरांवर माझा आणि पक्षाचा विश्वास नसल्याचेही ते म्‍हणाले.

टॉयलेट क्लीनर जेवणात मिसळले होते : बुशरा बीबींचा आराेप

न्यायालयाने त्यांना पत्नी बुशराच्या वैद्यकीय तपासणीबाबत सविस्तर अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले. सुनावणीनंतर  बोलताना बुशरा म्‍हणाल्‍या की, मी पाकिस्‍तानमधील अमेरिकन एजंट असल्याच्या अफवा पक्षात पसरत होत्या. माझ्‍या जेवणात टॉयलेट क्लिनर मिसळले जात होते. माझे डोळे सुजले आहेत, मला पोटात वेदना जाणवत आहे. अन्न आणि पाण्याची चव देखील कडू होत आहे.

बुशरा बीबीच्या कुटुंबीयांना भेटू दिले जात नाही : तेहरीक-ए-इन्साफ

तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्‍या प्रवक्त्याने बुशरा बीबी यांना विषबाधा झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बुशरा बीबी यांच्या कुटुंबाला त्‍यांना भेटण्यास मनाई केली जात आहे. पाकिस्‍तान संविधान आणि तुरुंगाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्‍याचोहेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news