मोठी बातमी : पाकिस्‍तानचा अफगाणिस्‍तानवर ‘एअर स्ट्राईक’, तीन मुलांसह ६ ठार

मोठी बातमी : पाकिस्‍तानचा अफगाणिस्‍तानवर ‘एअर स्ट्राईक’, तीन मुलांसह ६ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानच्‍या हवाई दलाने अफगाणिस्‍तानवर हवाई हल्‍ला ( एअर स्‍ट्राईक ) केला आहे. या हल्‍ल्‍यात तीन महिलांसह तीन मुलांचा मृत्‍यू झाला आहे. मालमत्तेचेही नुकसान झाले आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Pakistan's airstrikes in Afghanistan) दरम्‍यान, वायव्य पाकिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात सात सैनिकांना ठार केल्यानंतर दोन दिवसांनंतर पाकिस्‍तानने ही कारवाई केली. या हल्‍ल्‍यामुळे उभय देशांमध्‍ये तणाव आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. हा हल्‍ला आमच्‍या  सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा असून, याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा अफगाणिस्‍तानने दिला आहे.

Pakistan's airstrikes in Afghanistan : नागरिकांच्‍या घरांना केले लक्ष्‍य

तालिबान-नियंत्रित अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी जारी केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, अफगाणिस्‍तानमधील पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यात आणि खोस्त प्रांतातील सेपेरा जिल्ह्यातील अफगाण दुबई भागात पाकिस्तानी लष्करी विमानांनी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या घरांना लक्ष्य करण्‍यात आले. यामध्‍ये सहा नागरिक ठार झाले आहेत. मृतांमध्‍ये तीन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. खोस्तमध्ये दोन महिलांचा घर कोसळल्यामुळे मृत्यू झाल्याचेही जबिहुल्ला मुजाहिद यांनी म्‍हटले आहे. (Pakistan's airstrikes in Afghanistan)

रविवारी मध्‍यरात्री तीनच्‍या सुमारास पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात आणि खोस्त प्रांतातील सेपेरा जिल्ह्यातील अफगाण दुबई भागात पाकिस्तानी विमानांनी नागरिकांच्या घरांवर बॉम्बफेक केली. पक्तिकामध्ये एक तर खोस्त प्रांतात एक घर कोसळले. (Pakistan's airstrikes in Afghanistan) या हल्‍ल्‍यांबाबत पाकिस्‍तानच्‍या लष्‍कराने कोणतीही भाष्‍य केलेले नाही. 2022 नंतरचे प्रथमच पाकिस्‍तानने अफगाणिस्‍तानवर हवाई हल्ले केले आहेत.

अशा हल्‍ल्‍यांचे खूप वाईट परिणाम होतील : अफगाणिस्‍तानचा पाकिस्‍तानला इशारा

दहशतवादी अब्दुल्ला शाह याला लक्ष्‍य करण्‍यासाठी हा हवाई हल्‍ला केल्‍याचा दावा पाकिस्‍तानने केला आहे. मात्र हा अब्दुल्ला शाहचे वास्‍तव्‍य पाकिस्‍तानमध्‍येच असल्‍याचा दावा अफगाणिस्‍तानने केला आहे. तसेच पाकिस्‍तानने आपल्‍या अंतर्गत संघर्षासाठी अफगाणिस्तानला दोष देणे निराधार असल्‍याचेही अफगाणिस्‍तानने म्‍हटले आहे. तसेच अशा हल्‍ल्‍यांचे खूप वाईट परिणाम होतील, असा इशाराही अफगाणिस्‍तानने दिला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news