पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची ऑफर मिळणे वा एका दिग्गज अभिनेत्रीची भूमिका असलेला चित्रपटाची ऑफर मिळणे, हे एखाद्या कलाकारासाठी स्वप्नवतचं असते. पण, एक पाकिस्तानी गायक अबरार उल हक याने दावा आहे की, त्याने कॅटरीना कैफची भूमिका असलेल्या बॉलीवूड चित्रपटाची ऑफर सपशेल नाकारली. त्याने ही आऑफर का नाकारली, याचे स्पष्टीकरण देखील दिले आहे.
लोकप्रिय पाकिस्तानी गायक अबरार उल हक याने अलीकडेच कॅटरिना कैफच्या चित्रपटाची ऑफर नाकारल्याचा खुलासा केला आहे. एका पॉडकास्टच्या भागात तो म्हणाला, 'होय, मला भारतातून अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या आणि अल्बमची डीलही होती. पण मला त्यांचा करार समजला नाही. ज्याने काश्मीरसारख्या विशिष्ट विषयांवर बोलण्यास प्रतिबंध केले होते. ज्या देशाने भाषण स्वातंत्र्याचे समर्थन केले आहे त्यांनी अशा अटी लादू नयेत. त्यामुळे मी त्या ऑफर नाकारल्या.'
अबरारने असा दावाही केला की, त्याने कॅटरीनाची भूमिका असलेला चित्रपट नाकारला होता. त्याने चित्रपटाचे नाव उघड केले नसले तरी, अबरारने त्याच्या नकाराचे स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, त्याला अभिनयात प्रवेश करायचा नाही.
अबरार पुढे म्हणाला, 'एक कंपनी आहे… त्यांनी चित्रपटाची ऑफर दिली. अभिनेत्री कॅटरिना कैफ होती. माझे मित्र माझ्या मागे लागले होते, 'तुला नाही करायचं तर निदान आम्हाला जाऊ दे!' पण मला चित्रपट करायचे नव्हते. त्यांनी मला उत्साहाने बोलावले आणि म्हणाले, 'आम्हाला कोणीही नकार दिला नाही, पण तू आहेस. आम्हाला कोणीही सांगितले नाही की, त्यांना आमचे चित्रपट करायचे नाहीत. आम्हाला वाटलं तू धावत येशील."
भारतीय चित्रपटसृष्टीत अबरार चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी २०२२ मध्ये, त्याने करण जोहर आणि T-Series विरुद्ध कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. 'जुगजग्ग जीयो' चित्रपटासाठी त्याचे गाणे चोरल्याचा आरोप त्याने केला होता.