पाकिस्‍तानमध्‍ये पेट्रोल-डिझेलचे गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगवेगळे दर : पेट्रोलियम राज्यमंत्री मलिक

पाकिस्‍तानमध्‍ये पेट्रोल-डिझेलचे गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगवेगळे दर : पेट्रोलियम राज्यमंत्री मलिक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तान आता पुढील महिन्‍यापासून रशियाकडून पेट्रोल-डिझेलची आयात करणार आहे. याबाबत आम्‍ही रशियन सरकारबरोबर करार केला आहे. कच्‍च्‍या तेलाची पहिली खेल कार्गोने पाकिस्‍तानता पोहचेल. सरकार गरीबांना कमी दरात पेट्रोल आणि डिझेलचे वितरण करणार आहे, अशी माहिती पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सोमवारी ( दि. ३ ) दिली.

माध्‍यमांशी बोलताना मुसादिक मलिक म्‍हणाले की, "देशात पेट्रोल-डिझेलचे गरीब आणि श्रीमंत वर्गासाठी वेगवेगळे दर निश्चित केले जातील. पाकिस्तानला आर्थिक समस्या भेडसावत आहे, त्यामुळे आम्ही स्वस्त दरात तेल कसे आयात करू शकतो याचा शोध घेत होतो. सरकारने या दिशेने काम केले आणि आता गरीब आणि श्रीमंतांसाठी वेगळे दर आकारले जाईल. दर जाहीर झाल्यानंतर समाजातील गरीब वर्गाला दिलासा मिळणार आहे."

पाकिस्तान पेट्रोलियम विभाग मागील काही महिन्‍यांपासून रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे, रशियातून समुद्रमार्गे तेल येण्यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे. तेल कराराशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी पेमेंटची पद्धत, शिपिंग खर्च आणि विमा खर्च यासारख्या अटी पूर्ण केल्या गेल्या आहेत. रशियासोबतचा तेल करार हाही पाकिस्तानच्या राजकारणातील वादग्रस्त मुद्दा होता. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की, त्यांच्या सरकारने असे परराष्ट्र धोरण बनवले होते, ज्यामध्ये भारताप्रमाणेच पाकिस्तानलाही रशियाकडून स्वस्त तेल मिळू शकते.

अखेर कच्‍चे तेल खरेदीसाठी रशियाबरोबर करार

सध्याच्या सरकारने तेल आयातीसाठी मॉस्कोशी वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न केला. ऑक्टोबर 2022 मध्ये अर्थमंत्री इशाक दार म्हणाले होते की, देश रशियाकडून सवलतीत तेल खरेदी करण्याची तयारी करत आहे. मलिक तेल आणि वायू पुरवठ्यासाठी रशियालाही गेले. याशिवाय जानेवारीत रशियाचे शिष्टमंडळ कराराला अंतिम रूप देण्यासाठी इस्लामाबादला पोहोचले होते. अखेर पाकिस्‍तान सरकारच्‍या प्रयत्‍नांना यश आले असून, कच्‍चे तेल खरेदीसाठी रशियाबरोबर करार पूर्ण झाला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news