Ramiz Raja : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी धावला पाकिस्तान

Ramiz Raja : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेसाठी धावला पाकिस्तान

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचे आर्थिक संकट (Sri Lanka Crisis) अधिक गहिरे होत चालले आहे. लोक रस्त्यावर उतरुन राष्ट्रपती व इतर नेत्यांच्या घरावर हल्लाबोल करत आहेत. एकप्रकारे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या श्रीलंकेच्या मदतीसाठी पाकिस्तान (Ramiz Raja) धावून आला आहे. २७ ऑगस्ट पासून खेळवल्या जाणाऱ्या आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेचा आयोजक श्रीलंका आहे. तर श्रीलंका या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करु शकतो यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबत पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja)म्हणाले, श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (SLC) अधिकाऱ्यांशी आमचे बोलणे झाले आहे. आम्ही त्यांना असे आश्वासन दिले आहे की, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येणारा आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकाच करेल व त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. रमीझ राजा यांनी श्रीलंका क्रिकेटच्या अधिकाऱ्यांना आश्वस्थ केले की, आम्ही श्रीलंकेला पाठिंबा देऊ, अशाने मोठ्या स्पर्धेने श्रीलंकेतील पर्यटन वाढेल आणि श्रीलंकेला थोडासा आर्थिक दिलासा मिळू शकेल.

शिवाय पाकिस्तानकडून हे देखील सांगण्यात आले की, श्रीलंकेत अशांततेची परिस्थिती जरी असली तरी, गॉल आणि कोलंबो येथील कसोटी सामने पाकिस्तान खेळेल. रमीज राजा म्हणाले, या दरम्यान आशिया क्रिकेट परिषदेची कोणतीही बैठक होणार नाही. पण, २२ ऑगस्ट दरम्यान बर्घिंहम (इंग्लंड) मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीला सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या दरम्यान आशिया कपचे आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानला देण्याबाबत चर्चा होऊ शकते. (Ramiz Raja)

रमीझ राजाचा आयपीएलचा कालावधी वाढविण्याला विरोध (Ramiz Raja)

पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार तसेच पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी २०२३ पासून सुरु होणाऱ्या एफटीपी प्रोग्रॅम अंतर्गत बीसीसीआयच्या आयपीएलला अडीच महिन्यांचा कालवधी आयसीसीने वाढवून दिला आहे. रमीझ राजा यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे तसेच या बैठकीत सुद्धा ते आयसीसीला यावर पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहेत. मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडुंना आयपीएल खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आयसीसीने आयपीएल खेळण्याचा कालावधी वाढवून दिला आहे. पाकिस्तानचे कोणतेही खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत. तर भारत पाकिस्तान सोबत सामने खेळत नाही. त्यामुळे आयपीएलला वाढवून दिलेला अवधीमुळे पाकिस्तानला कोणताही फायदा होत नाही म्हणून त्यांचा विरोधाचा सूर आहे.

या शिवाय आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या वेतनाचे १० टक्के रक्कम ही संबधित खेळाडूंच्या बोर्डाला मिळते. त्यामुळे पाकिस्तानला वाटते त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळावी व त्याद्वारे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा फायदा व्हावा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news