World Test Championship : कसोटी विश्‍वचषक स्‍पर्धेतून पाकिस्‍तान ‘आऊट’

World Test Championship : कसोटी विश्‍वचषक स्‍पर्धेतून पाकिस्‍तान ‘आऊट’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानच्‍या क्रिकेट संघाला वर्षाच्‍या पहिल्‍याच दिवशी मोठा धक्‍का बसला आहे. कारण हा संघ कसोटी विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍याच्‍या स्‍पर्धेतून आता बाहेर पडला आहे, अशी माहिती आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्विटरच्‍या माध्‍यमातून दिली आहे.  ( World Test Championship )

World Test Championship : इंग्‍लंड विरुद्ध पाकिस्‍तानची हाराकिरी

मागील महिन्‍यात पाकिस्‍तानमध्‍ये इंग्‍लंड विरुद्धच्‍या कसोटी मालिका झाली. तीन सामन्‍यांच्या मालिकेत पाकिस्‍तानचा नामुष्‍कीजनक पराभव झाला. तिन्‍ही सामन्‍यात पाकिस्‍तानचा पराभव झाला. आजवरचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. इंग्‍लंडच्‍या संघाने 0-3 अशी मालिका जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यामुळे गुणतालिकेत पाकिस्तान पिछाडीवर पडला होता.

न्‍यूझीलंड विरुद्धचा पहिला सामना अनिर्णित

इंग्‍लंडकडून पराभूत झाल्‍यानंतर पाकिस्‍तानच्या संघाला न्‍यूझीलंडविरुद्‍च्‍या पहिला सामन्‍यात विजय अनिवार्य होता. मात्र पहिला सामना अनिर्णित राहिला. यानंतर पाकिस्‍तानचा कसोटी विश्‍वचषकच्‍या अंतिम सामन्‍याच्‍या स्‍पर्धेतून बाहेर झाला होता. आयसीसीने आपल्‍या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्वीट करत अंतिम सामन्यासाठी आता कोणते संघ स्पर्धेत आहेत, याची माहिती दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news