इस्लामाबाद : पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अन्नपदार्थांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभर निदर्शने होत आहेत. गव्हाच्या पीठाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान पीठालाही महाग झाला आहे.
पंधरा किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीच्या किमतीत दोन आठवड्यात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. आता पंधरा किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीची किंमत 2,050 रुपयांवर (पाकिस्तानी रुपये) गेली आहे. खैबर पख्तुनवा प्रांतात वीस किलो पिठाची पिशवी 3100 रुपयांवर गेली आहे. जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी स्वाबीतील शेवा अड्डा चौकात महागाई, खंडणी, दरोड्याच्या घटना, वीज लोडशेडिंग आणि नैसर्गिक वायू केंद्रे बंद करण्याच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.त्यामुळे सरकारवर दबाव वाढत चालला आहे.
काही दिवसांपूर्वी गव्हाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानातील बाजारपेठांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात अनेक घटना घडल्या.
लाहोर शहरात गव्हाच्या पिठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पंधरा किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीच्या किमतीत दोन आठवड्यात 300 रुपयांनी वाढ झाली आहे. आता पंधरा किलो गव्हाच्या पिठाच्या पिशवीची किंमत 2,050 रुपयांवर (पाकिस्तानी रुपये) गेली आहे. खैबर पख्तुनवा प्रांतात वीस किलो पिठाची पिशवी 3100 रुपयांवर गेली आहे. कराचीत एक किलो पीठ 140 ते 160 रुपये, इस्लामाबाद, पेशावरमध्ये दहा किलोची पिशवी 1500 रुपये, वीस किलोची पिशवी 2800 रुपयांवर गेली आहे. गहू उत्पादक असलेल्या पंजाब प्रांतात पिठाच्या गिरण्यांचे मालक प्रति किलो 160 रुपयांनी गव्हाचे पीठ विकत आहेत.
कराची : पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गडद होत चालले आहे. पाकिस्तानची श्रीलंकेच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. पाकिस्तानी रुपयाही झपाट्याने कमकुवत होत असल्याने, देशाच्या आर्थिक स्थितीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या घसरणीमुळे विनिमय दराला मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानी रुपयाचे मुल्या डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मुल्य 229.35 झाले आहे.