मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरला पाकिस्तानात अटक

26/11 Terror Attack
26/11 Terror Attack
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीर याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे. लाहोरमधील दहशतवादाला फंडिंग केल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने १५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. साजिद मीर हा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतील दहशतवादी आहे.

लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना फंडिंग पुरवणाऱ्यासंदर्भात प्रकरणे हाताळणाऱ्या एका वरिष्ठ वकिलांने सांगितले की, या महिन्याच्या सुरूवातीला लाहोरमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने बंदी घातलेल्या लष्कर ए तोयबाशी संबंधित असलेल्या साजिद मजीद मीर याला १५ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानने वारंवार साजिद मीर हा पाकिस्तानात नसल्याचे सांगत, त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावादेखील वारंवार केला होता. मात्र आरोपी दहशतवादी साजिद मीर याला एप्रिलमध्येच अटक करण्यात आली आहे. यावेळीपासून तो कोट लखपत तुरूंगात आहे. न्यायालयाने त्याला कारावासाबरोबर ४ लाख रूपयांचा दंडदेखील ठोठावला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन एजन्सी एफबीआय दहशतवादी साजिद मीर याच्या शोधात आहे. या अमेरिकन एजन्सीने या दहशतवाद्याला शोधणाऱ्याला पाच लाखांचे बक्षिस देखील जाहीर केले होते. याचबरोबर भारतातील २००८ आणि २६/११ मुंबई हल्ल्याचा मुख्यसूत्रधार आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेला दहशतवादी साजिद मीर याच्या शोधात होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news