COVID-19 |ऑक्सफोर्डला मोठा धक्का! नेझल स्प्रे कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी अयशस्वी

COVID-19 |ऑक्सफोर्डला मोठा धक्का! नेझल स्प्रे कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी अयशस्वी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑक्सफोर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या नाकावाटे (nasal-spray version) दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीची (COVID-19) पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी अयशस्वी ठरली आहे. ऑक्सफर्ड (Oxford) युनिव्हर्सिटीचे संशोधक आणि अॅस्ट्राझेनेका Plc (AZN.L) यांनी संयुक्तपणे ही लस विकसित केली होती. ही लस नेझल स्प्रेद्वारे दिली जाणार होती. पण या लसीची पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी अयशस्वी ठरल्याने या COVID-19 लस तयार करणाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. या लसीच्या मानवांवरील सुरुवातीच्या चाचणीत अपेक्षित संरक्षण मिळालेली नाही.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीवेळी श्वासनलिका अस्तरमध्ये (श्लेष्मल त्वचा) अँटिबॉडी रिस्पॉन्स कमी प्रमाणात दिसून आला. तसेच रक्तातील रोगप्रतिकारक शक्ती शॉट-इन-द-आर्म लसीकरणापेक्षा कमकुवत दिसून आली.

जगभरातील संशोधकांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड-१९ (COVID-19) लसीबद्दल खूप आशा होत्या. कारण ही लस केवळ रोगच नव्हे तर संसर्गास प्रतिबंधित करते असे मानले जात होते. कारण ती थेट श्वसनमार्गामध्ये रोगप्रतिकारक प्रतिसाद देऊ शकते, जिथे विषाणू शरीरात प्रवेश करतो. याव्यतिरिक्त, नेझल स्प्रेद्वारे लस देण्याची पद्धत इंजेक्शनपेक्षा कमी वेदनादायक आणि हाताळण्यास सोपी असते, असा संशोधकांचा दावा आहे.

गेल्या महिन्यात कोरोना नियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेल्या व नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला भारतात मंजुरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने ही मंजुरी दिली. भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस विकसित केली आहे. कोरोनावर भारतात नाकावाटे दिली जाणारी ही पहिली लस असेल. भारत बायोटेकने या लसीबाबत आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या लसीला आता DCGI कडून हिरवा कंदील मिळाला आहे.

सामान्य लसीपेक्षा नाकाद्वारे दिली जाणारी लस अधिक प्रभावी आहे. कोरोना विषाणूचे नाकावाटे संक्रमण अधिक होते, त्यामुळे भारत बायोटेकच्या या लसीद्वारे प्रथम नाकात अँटीबॉडीज तयार केल्या जातील. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत विषाणू पोहोचणे कठीण होईल, असा संशोधकांकडून दावा केला जात आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news