सरकारी कार्यालयाच्‍या तळघरात सापडलं ‘घबाड’, तब्‍बल दोन कोटींहून अधिक निनावी रोकड, १ किलो सोने जप्‍त; जयपूरमध्‍ये खळबळ

सरकारी कार्यालयाच्‍या तळघरात सापडलं ‘घबाड’, तब्‍बल दोन कोटींहून अधिक निनावी रोकड, १ किलो सोने जप्‍त; जयपूरमध्‍ये खळबळ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थानमधील जयपूर येथील योजना भवनाच्या तळघरातील कपाटातून पोलिसांनी तब्‍बल दोन कोटींहून अधिक निनावी रोकड, १ किलो सोने जप्‍त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात ते आठ जणांना ताब्यात घेतल्‍याची माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली. विशेष म्‍हणजे दोन हजार रुपयांच्‍या नोटाबंदीचा निर्णय शनिवारी रात्री जाहीर झाल्‍यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाल्‍याने जयपूरमध्‍ये खळबळ उडाली आहे.

योजना भवनमध्‍ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे (आयटी) कार्यालय आहे. आयटी विभागाचे अतिरिक्त संचालक महेश गुप्ता यांनी पोलिसांना माहिती दिली की त्यांना त्यांच्या तळघरातील कपाटात रोख रक्कम आणि सोन्याचा बार सापडला आहे. माहितीच्या आधारे जयपूर शहर पोलिसांनी ही रोकड व सोने जप्त केली आहे, अशी माहिती मुख्य सचिव उषा शर्मा आणि जयपूरचे पोलिस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सीसीटीव्‍ही फुटेज घेतले ताब्‍यात

कपाटात ठेवलेल्‍या बॅगेत सुमारे २.३१ कोटी रुपयांची रोकड आणि १ किलो सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. तळाघरातील सीसीटीव्ही फुटेज शोधले जात आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे, असेही आनंद कुमार श्रीवास्तव यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news