आपण खादाड आहात का?, हे एक मानसिक आजाराचे लक्षण असू शकतं, असा करा ओव्हर इटिंगपासून बचाव!

आपण खादाड आहात का?, हे एक मानसिक आजाराचे लक्षण असू शकतं, असा करा ओव्हर इटिंगपासून बचाव!
Published on
Updated on

अनेकांना आपण खादाड आहोत, याची कल्पनाही नसते. त्यामुळे आपल्या फूड हॅबिट आणि संख्येवर लक्ष ठेवायला हवे. आपल्या कुटुंबात एखादा सदस्य खादाड असेल किंवा ओव्हर इटिंग करत असेल, तर त्यापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करायला हवा.

खाण्याच्या क्षमतेबाबत जेव्हा चर्चा रंगते तेव्हा प्रत्येकाची कहाणी वेगळी असते. आपल्याकडे अशी काही मंडळी आहेत, ज्यांची शरीरयष्टी सामान्य किंवा अगदी सडपातळ असली, तरी त्यांचा आहार खूप असतो. ते पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. परंतु, ही बाब केवळ आपल्यापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण जगात अशा मंडळींचा भरणा आहे. याचा एकच अर्थ असा की, काही जण खरोखरच गरजेपेक्षा अधिक सेवन करत असतात.

मेंटल डिसिजची शक्यता : सामान्यापेक्षा अधिक आहार करणार्‍या मंडळींबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. हा आहार त्यांच्या गरजेनुसार आहे का? तर, त्याचे उत्तर नाहीच, असे असेल. कारण, अधिक जेवण करणे हे एक प्रकारे मानसिक आजाराशी जोडलेले आहे.

त्यामुळे आपण अधिक आहार घेत असाल, तर ती आपली गरज आहे, असा विचार करू नका. हे एक मानसिक आजाराचे लक्षण असू शकते आणि त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करावा.

मुलांना असे रोखा : आपण पालक असाल आणि आपला मुलगा त्याच्या वयोगटातील अन्य मुलांपेक्षा अधिक सेवन करत असेल, तर आनंदी होऊ नका. अशा कृतीने आपल्या मुलाला भविष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे त्याचा आहार संतुलित करण्याचा प्रयत्न करा. यासाठी काही ट्रिक्सचा वापर करा. त्याच्या आवडत्या गोष्टी, खेळात त्याचे मन गुंतवा. तो जर यात अडकला, तर भुकेची आठवण राहणार नाही. आवडीच्या डिश आणि जंक फूड हे कमी प्रमाणात द्यावे.

ओव्हर इटिंगपासून बचावासाठी…

आपण खूप खात असाल आणि ही सवय कमी करायची असेल, तर आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे जो आहार तुम्ही सेवन करता, ते चांगल्या रितीने चावून खा. अर्थात, हा काही नवीन विचार नाही. लहानपासून एक गोष्ट ऐकत आलोय की, एक घास बत्तीस वेळा चावणे. आहारतज्ज्ञदेखील जेवण पोटात ढकलण्याअगोदर चांगल्या रितीने चावावे आणि यादरम्यान थोडे थोडे पाणी प्यावे, असे सांगतात. याचा अर्थ जेवणाचा वेग कमी करणे होय. संशोधक म्हणतात की, सडपातळ व्यक्तीच्या मेंदूपर्यंत भोजनाची तृप्ती पोहोचण्यास तब्बल 12 मिनिटे लागतात. परंतु, हेच काम करण्यासाठी लठ्ठ माणसाला 20 ते 25 मिनिटे लागतात. म्हणून सावकाश खाल्ल्यानंतर हा महत्त्वाचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

काम करताना अन्नसेवन नको : गाडी चालवत असताना किंवा संगणकावर काम करत असताना आहाराचे टाळावे. आपला मेंदू हा एखाद्या कामात गुंतलेला असतो किंवा घाईत असतो. कामादरम्यान केलेल्या सेवनाची नोंद ही मेंदूकडे होत नाही. जेवणाचा आस्वाद घ्या आणि आहाराकडे लक्ष द्या. आहार पुरेसा आहे की नाही, याकडे लक्ष द्या. सुरुवातीचे काही घास खाल्ल्यानंतर 'टेस्ट बडस्'ची संवेदना कमी होते. या 'टेस्ट बडस्' आहाराला चटकदार करण्याचे काम करतात. आपल्या 'टेस्ट बडस्' समाधानी राहिल्यास ओव्हर इटिंग होण्याचा धोका असतो. त्यामुळे जेव्हा जेवणाची चव कमी होते, तेव्हा तत्काळ जेवण थांबवावे.

फायबर-प्रोटिनचे अधिक सेवन: ओव्हर इटिंगपासून वाचण्यासाठी अधिक कॅलरी प्रदान करणार्‍या गोष्टींपासून दूर राहा. मिल्क शेक, चीज, चॉकलेट आदी. फूडमध्ये जेवढेे अधिक फायबर, प्रोटिन आणि पाणी असेल, त्यानुसार आपले पोट समाधानी राहील. आपण जादा कॅलरी सेवन करण्यापासून दूर राहाल.

डॉ. मनोज कुंभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news