Oscars 2023 : भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

ऑस्कर पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या द एलिफंट व्हिस्परर्स (The Elephant Whisperers) या  माहितीपटाने ऑस्कर पुरस्कारावर (Oscars 2023) मोहर उमटवली आहे. डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म कॅटेगरीत भारतातून नामांकन मिळालेल्या द एलिफंट व्हिस्पर्सने बाजी मारली आहे. या माहितीपटाचे निर्माते गुनीत मोगाने तर दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस हे आहेत. (Oscars 2023)

Oscars 2023 : काय आहे माहितीपटात ऑस्कर

गुनीत मोगाने हे निर्माता असलेल्या  द एलिफंट व्हिस्परर्सने (The Elephant Whisperers) २०२३ मधील ऑस्कर पुरस्कारावर मोहर उमटवलेली आहे. या माहितीपटात तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील एका कुटुंबाची हृदयाला भिडणारी गोष्ट दाखवण्यात आली आहे.  या कुटुंबातील सदस्य अनाथ हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांची कस संगोपन करतं हे दाखवल आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील निःस्वार्थ प्रेमाचे चित्रण करते. अनाथ हत्ती रघूची काळजी घेण्याची जबाबदारी पती-पत्नीने घेतली आहे. रघूला वाचवण्यासाठी हे जोडपं किती कष्ट घेतं हे माहितीपटात दाखवण्यात आलं आहे.

माहितीपटात दक्षिण भारतीय जंगलांचे सौंदर्य टिपण्यात आले आहे. एक दक्षिण भारतीय जोडपे 'द एलिफंट व्हिस्पर्स'मध्ये रघूचे अस्तित्व वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. ते रघूचे रक्षण तर करतातच, पण त्याला देवाचा दर्जा देऊन त्याची पूजाही करतात.

पुरस्कारानंतर गुनीत मोंगा यांची पहिल ट्विट

"आम्ही नुकताच भारतीय निर्मितीसाठी पहिला ऑस्कर जिंकला! दोन महिलांनी हे केले! मी अजूनही थरथर कापत आहे," असे ट्विट 'द एलिफंट व्हिस्परर्स'चे निर्माते गुनीत मोंगा यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix Queue (@netflixqueue)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news