कोल्हापूर : मदरशाचे बांधकाम हटविण्यास विरोध : ६०० जणांवर गुन्हा

file photo
file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीतील अनधिकृत मदरशाचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा तसेच महापालिकेला घेराव घातल्याप्रकरणी गणी आजरेकर, यासिन बागवान, मोहसिन दिलावर यांच्यासह 600 जणांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. बुधवारी (दि. 31) ही घटना घडली होती.

येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील अलिफ अंजुमन मदरसा व सुन्नत जमातीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासह पोलिसांचा फौजफाटा तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी 31 जानेवारी रोजी सकाळी मदरशाच्या ठिकाणी दाखल झाले होते. त्यावेळी गणी आजरेकर यांच्यासह लक्षतीर्थ वसाहत परिसरातील महिलांसह तरुणांनी कारवाईला जोरदार विरोध केला. घटनास्थळासह परिसरात ठिय्या मारून अडथळा निर्माण केला.

आजरेकरसह त्यांच्या सहकार्‍यांनी मुस्लिम तरुण, महिलांना चिथावणी देऊन महापालिकेच्या कार्यालयाजवळ घेराव घालण्यासाठी प्रवृत्त केल्याचा संशय आहे. जमावातील काही तरुणांनी अधिकार्‍यांसह पोलिसांच्या अंगावरही धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. जमावबंदीचा आदेश लागू असतानाही संशयिताकडून शांतता सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. शासकीय कामात अडथळा आणल्याने परिसरात तणाव व वाहतूक विस्कळीत झाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने संशयितांवर कारवाई करण्याचे निर्देश लक्ष्मीपुरी पोलिसांना देण्यात आले होते.

संशयितांना लवकरच अटक

संशयित गणी आजरेकर, यासिन बागवान, मोहसिन दिलावर, फरिदा पाटणकर, कौसर मुजावर, मनोज बागवान, शकिल मुल्लाणी, तौसिफ खान, सलीम पन्हाळकर, इरफान बागवान यांच्यासह सुमारे 600 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

120 संशयितांची नावे निष्पन्न : तिघे ताब्यात

संशयितापैकी 120 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. शनिवारी सायंकाळी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मोबाईलवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी यासिन बागवान याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news