राजू श्रीवास्तवच्या कक्षात ‘या’ एका व्यक्तीलाच प्रवेश, घरच्या इतर सदस्यांना आहे मनाई

राजू श्रीवास्तवच्या कक्षात ‘या’ एका व्यक्तीलाच प्रवेश, घरच्या इतर सदस्यांना आहे मनाई

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेता, कॉमेडियन राजू श्रीवास्तव याच्या प्रकृतीमध्ये हळू हळू का होईना सुधारणा होते आहे. राजू गेले 19 दिवस व्हेंटिलेटरवर मृत्युशी झुंज देत आहेत. एम्समध्ये राजूवर उपचार केले जात आहेत. राजू यांना शुद्ध आली नसली तरी त्यांचं शरीर उपचारांना प्रतिसाद देत आहे. जर सगळं नीट असेल तर राजू लवकरच शुद्धीवर येण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

राजू यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी चाहते रोज प्रार्थना करताना दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजू यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजू यांच्या हात आणि पायांची हालचाल सुरू झाल्याच कुटुंबियांनी शेअर केलं आहे.सध्या राजूच्या आयसीयू रूममध्ये केवळ पत्नीला जाण्यासाठी डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. राजूच्या मेंदूला झालेलं इन्फेक्शन रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं डॉक्टरांनी शेअर केलं आहे. याशिवाय इतर सदस्यांना राजू यांच्या रूममध्ये जाण्यास मनाई आहे.

राजूच्या एका चाहत्यांनी त्यांच्यावर गाणंही बनवलं आहे. यामध्ये चाहते त्यांच्या प्रार्थना करताना दिसत आहेत. जीममध्ये असताना राजू यांना अटॅक आला होता. त्यानंतर त्यांच्या मेंदूने काम करणं बंद केलं होतं.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news