फक्त 6 दिवस उरले! नामिबियातील चित्ते भारतातील ‘या’ राष्ट्रीय उद्यानात पोहोचणार

फक्त 6 दिवस उरले! नामिबियातील चित्ते भारतातील ‘या’ राष्ट्रीय उद्यानात पोहोचणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : दक्षिण आफ्रिकेतील नामिबियातून 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्ते दाखल होतील. त्यामुळे वन्यजीव प्रेमींना आता लवकरच चित्ता पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्त्यांना त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्त्यांसाठी खास बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये सोडण्यात येईल, असे राज्याचे वनमंत्री विजय शाह यांनी शनिवारी सांगितले.
महत्त्वाकांक्षी चित्ता री-इंट्रोडक्शन प्रकल्पासाठी कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात केलेल्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. 17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.

भारतातून 1955 च्या आसपास चित्ता नामशेष झाला होता. 1951 मध्ये आंध्रप्रदेशातील जंगलात शेवटचा जंगली चित्ता दिसल्याची नोंद आहे. एकेकाळी चित्ता हा अफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता, . भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. परंतु आज केवळ अफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते चित्त्याचे स्थान मर्यादित राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान हे आहे. चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे. त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला.

चित्त्याने उत्क्रांतीमध्ये वेग मिळवला खरे परंतु त्याने शारीरिक ताकद गमावली. त्यामुळे बहुतेक वेळा चित्ता त्याच्या पिलांचे इतर भक्षकांपासून अथवा त्याने मिळवलेल्या भक्ष्याचे रक्षण करू शकत नाही. त्यामुळे चित्त्याची संख्या बऱ्याच ठिकाणी कमी झाली चित्त्याची बंदिवासात वीण होत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे भारतातून चित्ता नामशेष झाला आहे.

महाराष्ट्रातील मुख्यत्वे मराठवाडा, विदर्भ व पश्विम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात चित्ता होता अशी नोंद आहे. विदर्भातील शिकाऱ्यांनी चित्याच्या शिकारी केल्याच्या नोंदी आहेत. आशियाई चित्त्याची आज केवळ इराणमध्ये जवळपास पन्नास इतकी संख्या राहिली आहे. अधूनमधून बलुचिस्तानमध्ये चित्ता दिसण्याच्या घटना घडतात.

अफ़्रिकेतील मुख्यत्वे सव्हानाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्त्याचे अस्तित्व आहे. जेथे खाद्याची मुबलकता आहे, अशा भागात अजूनही चित्ते आढळतात. केनिया, झिंबाब्वे, बोटस्वाना, दक्षिण आफ्रिका, नामीबिया, युगांडा इत्यादी देशांत चित्ता आढळतो.

त्यामुळे भारत सरकारने भारतात पुन्हा चित्ता आणून त्याचे संवर्धन करण्यासाठी 'चित्ता री-इंट्रोडक्शन' हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पा अंतर्गत भारताने नामिबियाशी चित्ते मागवण्यासंदर्भात करार करण्यात आला. या अंतर्गत नामिबियातून चित्ते मागवण्यात आले. हे चित्ते येत्या 17 सप्टेंबरला भारतात पोहोचणा आहेत. त्यांना कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येणार आहे. उद्यानात चित्त्यासाठी खास निवा-याची बांधणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news