नाशिक : विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू; कमाल २४०१ रुपयांचा मिळाला दर

विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू
विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. असे असताना आजपासून विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू झाले. कांद्याला कमीत कमी १००० तर जास्तीत जास्त २४०१ तर सरासरी २१०१ रुपये भाव मिळाला. आठ दिवसांच्या बंद नंतर कांदा लिलाव सुरळीत झाल्याने विंचूर उपबाजार आवारात रौनक पहायला मिळाली. लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान सदस्य पंढरीनाथ थोरे यांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत विंचूर व्यापारीवर्गाची बैठक घेत लिलाव सुरू केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दि.२६ रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ही कुठलाही तोडगा न निघाल्याने व्यापारी कांदा लिलावात व्यापारी सहभागी होणार नव्हते, मात्र विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा विक्रीची व्यवस्था सुरू झाली आहे. चाळीत साठवलेला कांदा खराब होत असल्याने बाजार समिती बंदचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार विंचुर येथे कांदा शेतीमालचे व्यवहार सुरु असुन, २५० वाहनांतून उन्हाळ कांदा आवक होऊन कांद्याला कमीत कमी १००० ते जास्तीत जास्त २४०१ तर सरासरी २१०१ रुपये भाव मिळाला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news