एका गोळीने फुप्फुसाचा कॅन्सर बरा होणार

एका गोळीने फुप्फुसाचा कॅन्सर बरा होणार

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : कर्करोग किंवा कॅन्सर म्हटले की, काळजात धस्स होते. तथापि, आता फुफ्फुसाचा कॅन्सर केवळ एका गोळीने बरा होणार आहे. तब्बल दहा वर्षांच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी अक्षरशः हा चमत्कार घडविला आहे.

ओसिमेरटिनीब या नावाची ही क्रांतिकारी गोळी फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करू शकते, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार सुरू असताना गोळीचे सेवन केल्यास मृत्यूचा धोका 51 टक्क्यांनी कमी होतो, असा दावादेखील संशोधकांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळीचे सेवन करावे अशा सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. येल विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली शिकागो येथील अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (एएससीओ) च्या वार्षिक बैठकीत या गोळीच्या संशोधनबाबतची माहिती जाहीर करण्यात आली.

ही गोळी फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. दरवर्षी सुमारे 1.8 दशलक्ष रुग्णांचा फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो.

ब्रिटन, अमेरिकेत औषध उपलब्ध

26 देशांतील 30 ते 86 वर्षे वयोगटातील रुग्णांवर या गोळीचे परीक्षण करण्यात आले. हे सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण होते. त्यांच्यावर या औषधाचा चांगला परिणाम दिसून आल्याचा दावा डॉ. हर्बस्ट यांनी केला आहे.

ही गोळी जगातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या चतुर्थांश रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शिकागो कॅन्सर कॉन्फरन्समध्ये हे औषध ब्रिटन, अमेरिका यांसारख्या जगातील काही मोठ्या देशांमध्ये उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इतर देशांमध्येही ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. हर्बस्ट यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news