ठाण्यातील घोडबंदर रोडवर कंटेनरला भीषण आग; एकाचा जागीच मृत्यू

कंटेनरला भीषण आग; एकाचा जागीच मृत्यू
कंटेनरला भीषण आग; एकाचा जागीच मृत्यू
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्‍तसेवा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी पार्क, पातलीपाडासमोर हेवी कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. यानंतर या कंटेनरला भीषण आग लागली. या अपघातात एका व्यक्‍तीचा जळून मृत्‍यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. यावेळी अग्‍निशमन दल, आपत्‍ती व्यवस्‍थापन पथकाने आग आटोक्‍यात आणली.

दरम्‍यान अपघातात जळून मृत्‍यूमुखी पडलेल्‍या व्यक्‍तीचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल हॉस्‍पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. तसेच अपघातग्रस्‍त कंटेनर वाहतूक पोलिसांकडून रस्‍त्‍याच्या बाजूला करण्यात आला असून, तब्‍बल ३ तासांच्या प्रयत्‍नानंतर रस्‍ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.


हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news