कोल्हापूर : सावली सोडणार आज, उद्या साथ..!

कोल्हापूर : सावली सोडणार आज, उद्या साथ..!

कुरूंदवाड, जमीर पठाण : कोल्हापूर जिल्ह्यात 5 ते 6 मे पर्यंत दोन दिवस एक नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी शून्य सावली अनुभवता येणार आहे. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणार्‍या सर्व भूभागांवर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि शून्य सावली दिवस अनुभवता येतो. हा योगायोग शुक्रवार आणि शनिवारी अनुभवता येणार आहे.

दरम्यान, सूर्याचे उत्तरायण सुरू झाले असून, शुक्रवारी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी 50 सेकंदांसाठी खिद्रापूर परिसरात शून्य सावली अनुभवता येणार आहे.

खिद्रापूर (ता. शिरोळ) कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप आणि त्याच्या ओळंबा रेषेत खाली असणारी रंगशिळा येथे शुक्रवार दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी 50 सेकंदांच्या शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रातील तसेच धार्मिक विश्वात या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे

शून्य सावली ही खगोलशास्त्रीय घटना दरवर्षी 2 वेळा घडत असते. अनेक अभ्यासक यावेळी खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात येत असतात.
शून्य सावलीचा अनुभव कसा घ्याल?

शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी दिलेल्या वेळेनुसार सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. यासाठी दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीची पोकळ प्लास्टिक पाईप किंवा कोणतीही उभी वस्तू अथवा आपणही उन्हात सरळ उभे राहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली पाहायला मिळणार नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news