Old Age Health : वृद्धापकाळात केवळ सांधेच नाही, तर पोटाच्या समस्याही वाढतात. बद्धकोष्ठता, वेदनादायक आतड्याची हालचाल आणि अॅसिड रिफ्लक्स यांसारख्या समस्या वयोवृद्धांना नियमित सतावतात. निरोगी जीवन जगण्यासाठी संतुलित जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे.
वृद्धांमध्ये अधूनमधून पोटदुखी, गॅस, छातीत जळजळ, मळमळ, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारखी पचनतंत्र बिघडवणारी लक्षणे जाणवतात. वयासंबंधित घटक तसेच औषधांसह बैठी जीवनशैली, दात किडणे आणि हिरड्यांचे आजार यांचा पचनसंस्थेवर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. सामान्यतः 60 आणि 70 च्या वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. वेदनादायक मलविसर्जन, अनियमित आणि कठीण मलविसर्जन, कोरडा मल ही याची लक्षणे आहेत. शिवाय, कोणत्याही शारीरिक हालचालींच्या अनुपस्थितीमुळेदेखील बद्धकोष्ठता होऊ शकते.
डायव्हर्टिक्युलर डिसीज : मोठ्या संख्येने लोकांना डायव्हर्टिकुलोसिस होतो. यामुळे गॅस, सूज येणे, पेटके येणे आणि बद्धकोष्ठता यांसारखी लक्षणे दिसून येतात. Old Age Health
पोटातील अल्सर : संधिवात किंवा इतर कोणत्याही स्थितीमुळे होणार्या वेदना नियंत्रित करण्यासाठी नॉनस्टेरॉईडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स वापरल्याने पोटात रक्तस्राव आणि अल्सर होऊ शकतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पोटातील रक्तसस्राव, जसे की रक्ताच्या उलट्या किंवा गडद मल दिसला तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज : हा सर्वात सामान्य अप्पर जीआय विकार आहे, जो बहुतेक वृद्ध प्रौढांमध्ये आढळतो. रात्री उशिरा जेवणे आणि फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. रक्तदाबासाठी घेतलेल्या औषधांमुळे छातीत जळजळ होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लठ्ठपणामुळे छातीत जळजळ आणि जीईआरडीची शक्यतादेखील वाढू शकते.Old Age Health
पोट खराब होणे : औषधे, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यांमुळेदेखील पोट खराब होऊ शकते. एखाद्याला पोट फुगल्यासारखे वाटू शकते आणि क्वचितच आतड्यांच्या हालचालीदेखील जाणवू शकतात.Old Age Health
पचन सुलभ करण्यासाठी ताजी फळे, तृणधान्य, भाज्या, शेंगा, कडधान्ये आणि बिया खाणे अत्यावश्यक आहे. फायबरयुक्त पदार्थ खावे आणि मसालेदार, तेलकट, हवाबंद डब्यातील प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. खारवलेले पदार्थ, बर्गर, पिझ्झा, चायनीज, बेकरी आयटम, कँडी, कोर्बोनेटेड पेये, मिठाई, समोसा, वडा आणि फ्रेंच फ्राईज यांचे सेवन टाळावे.Old Age Health