पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. अतिशय रंगतदार झालेल्या या पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी संपूर्ण ताकद लावली होती. यामध्ये मात्र रवींद्र धंगेकर विजयी झाले असून त्यांच्या विजयापेक्षा अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे या दोघांना पडलेल्या मतांची जास्त चर्चा रंगली आहे. दोघांनी विजय आमचाच होईल असा दावा केला होता. त्यामुळे सोशल मिडियावर राजकीय पक्षांचे काय अशी चर्चा चांगलीच रंगली होती.
अभिजीत बिचुकले यांना कसबा पेठविधानसभा मतदारसंघातून 47 मतं मिळाली आहेत. तर आनंद दवे यांना 296 मतं मिळाली आहेत. बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांनी हि निवडणूक चांगलीच रंजक ठरली. आज सकाळी ८ वाजल्यापासून विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सहाव्या फेरी अखेर अभिजीत बिचुकले यांना फक्त ४ मतं मिळाली. तर दुसरीकडे ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनीही विजयाचा दावा केला होता, मात्र त्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी 12 मते मिळाली. तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 100 मतं मिळाली आहेत.