पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. अहवालानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सामन्याचे ठिकाण निश्चित करू शकते. मात्र, याबाबत बीसीसीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. (ODI World Cup)
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपमधील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्याच्या चर्चा सुरू आहेत. या स्टेडियममध्ये सुमारे १ लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. बीसीसीआय आयपीएलनंतर लवकरच विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करू शकते. (ODI World Cup)
वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानचे पाकिस्तानचे बहुतांश सामने चेन्नई आणि बेंगळुरू येथे खेळले जातील तर. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबरपासून होऊ शकते. स्पर्धेचा अंतिम सामना नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतातील १२ स्टेडियम निवडण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर, बेंगळुरू, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदूर, बेंगळुरू आणि धर्मशाला यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा वनडे सामना २०१९ साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ८९ धावांनी जिंकला होता. सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला ४० षटकांत केवळ २१२ धावाच करता आल्या.
हेही वाचा;