Nuh Violence | नूहमध्ये चालला बुलडोझर, २४ तासांत १५० झोपड्या आणि ५ घरे जमीनदोस्त

Nuh Violence
Nuh Violence
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नूह हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. गुरुवारी (दि.३) सुमारे दीडशे स्थलांतरित कुटुंबांच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांनी दावा केला की या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे काही लोक ३१ जुलै रोजी झालेल्या जातीय दंगलीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे. ३१ जुलै रोजी धार्मिक मिरवणुकीत झालेल्या संघर्षाचे केंद्र असलेल्या भागात असलेल्या नल्हार येथील मंदिराजवळील पाच घरेही बुलडोझरने शुक्रवारी (दि.४) दुपारी उद्ध्वस्त करण्यात आली. या कॉलनीतील १४ तरुणांचा दगडफेकीत सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. (Nuh Violence )

प्रशासनाने सर्वसामान्यांना आवाहन करून बेकायदा अतिक्रमण व बेकायदा बांधकामे करू नयेत, असे करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

Nuh Violence : नियमानुसार कठोर कारवाई 

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल बोलताना म्हणाले, कोणत्याही बेकायदेशीर, समाजविरोधी बांधकाम आणि सहभागाला सोडले जाणार नाही. तर नुह जिल्ह्याचे उपायुक्त म्हणाले, नूह जिल्हा प्रशासन बेकायदा बांधकामांवर मोठी कारवाई करत आहे. जिल्ह्यात असामाजिक कृत्ये कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. असे करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. बेकायदा बांधकामे आणि समाजकंटकांवर जिल्हा प्रशासन कडक नजर ठेवत असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

३१ जुलै रोजी नूह जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक भेटीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, हरियाणा सरकारने गुरुवारी (दि.३) रात्री नूह पोलिस अधीक्षकांची बदली केली. नुहचे डीसी प्रशांत पनवार यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी धीरेंद्र खडगाटा हे नवे उपायुक्त असतील. खडगाटा हे यापूर्वीही नूहमध्ये डीसी होते. हिंसाचाराच्या दिवशी नूह जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वरुण सिंगला रजेवर होते. त्यांच्याकडे आता भिवानी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी एसपी नरेंद्र बिजार्निया यांना नूहची जबाबदारी देण्यात आली आहे. बिजार्निया हे यापूर्वी भिवानीचे एसपी होते.

नूह हिंसाचार पूर्वनियोजित : गृहमंत्री अनिल विज

नूह येथील हिंसाचारप्रकरणी (Haryana Nuh violence) हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Haryana Home Minister Anil Vij) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ३१ जुलै रोजी नूह येथे झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता आणि त्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु असल्याचे विज यांनी म्हटले आहे. "टेकडीवरुन गोळ्या झाडण्यात आल्या. छतावर दगड सापडले आहेत आणि मोर्चे उभारण्यात आले. हा पूर्वनियोजित कट होता आणि आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. मंदिरांजवळ लोक शस्त्रे घेऊन जमले होते, यावरुन हे पूर्वनियोजित होते हे स्पष्ट होते," असे विज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news