High Speed Rail : आता हाय स्पीड रेल्वेचे चाक, ट्रॅक भारतात बनणार

High Speed Rail : आता हाय स्पीड रेल्वेचे चाक, ट्रॅक भारतात बनणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान मोदी यांनी देशात 'मेक इन इंडिया'ची घोषणा केली. त्याअंतर्गत अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. आता हाय स्पीड रेल्वेचे चाक आणि ट्रॅक (High Speed Rail) देशातच बनवणार असल्याची महत्त्वाची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यासंदर्भात आज (दि.९) निविदा काढण्यात आली आहे. यामुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारत आता देशातच हाय स्पीड व्हील आणि हाय स्पीड रेल्वे  (High Speed Rail) तयार करणार आहे. आतापर्यंत व्हील आणि ट्रॅक आयात केले जात होते. परंतु आता ते भारतातच तयार करण्यात येणार असल्याने आगामी काळात निर्यात केले जाणार आहेत. ताशी १२० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी हाय-स्पीड चाकांची आवश्यकता असते. एलएचबी, वंदे भारत (लक्ष्य ४००) या गाड्यांना ही चाके असतात. याबाबत 'मेक इन इंडिया व्हील करार' या नावाचा एक करार करण्यात आला आहे.

१९६० पासून युरोपमधून ही चाके आयात केली जात होती. परंतु आता ही चाके भारतात तयार केली जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण निविदा प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे . वर्षामध्ये २ लाख चाकांची गरज आहे. सध्या एक प्लांट उभारायचा आहे. प्लांटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला ८० हजार चाके तयार करण्यासाठी दिली जातील. त्याची रक्कम वार्षिक ६०० कोटी इतकी आहे. १८ महिन्यांत कारखाना सुरू करून उत्पादन सुरू करण्याची योजना आहे, असेही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news