आता ‘हा’ साबण लढणार मलेरियाच्या डासांशी

आता ‘हा’ साबण लढणार मलेरियाच्या डासांशी
Published on
Updated on

न्यूयॉर्क : मलेरियाविरुद्ध अनेक दशकांपासून प्रभावी उपाययोजनेसाठी संशोधन सुरू आहे. आता मलेरियाच्या डासांविरुद्ध लढण्यासाठी संशोधकांनी चक्क साबणाचे हत्यार निर्माण केले आहे. टेक्सास युनिव्हर्सिटीतील संशोधकांना आढळले की कीटकनाशकांच्या काही प्रकारांत तरल साबणाचे थोडे प्रमाण त्यांची क्षमता दहा पटीने अधिक वाढवू शकते. सध्या मलेरिया फैलावणार्‍या डासांमध्ये कीटकनाशकांबाबत प्रतिरोधक क्षमता वाढत आहे. अशावेळी हे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते.

प्रयोगशाळेतील चाचण्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या चाचण्यांवरून हे दिसून आले की कीटकनाशकांबाबत प्रतिरोध दर्शवणार्‍या डासांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 'नियोनिकोटीनोइडस्' डासांच्या काही प्रजातींना कीटकनाशकांची क्षमता वाढवल्याशिवाय नष्ट करता येत नाही. त्यासाठी आता द्रवरूप साबणाची मदत होऊ शकते. मलेरिया हा डासांमुळे फैलावणारा एक जीवघेणा आजार आहे जो उप-सहारा आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत अधिक चिंतेचा विषय बनलेला आहे.

या आजारात थंडी-ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा अशी लक्षणे दिसतात. 2020 मध्ये जगभरात मलेरियाचे अनुमानित 241 दशलक्ष रुग्ण होते व 6,27,000 जणांचा यामुळे मृत्यू झाला. 'पीएलओएस नेग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिज' मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार तीन कमी खर्चाच्या तसेच जवसाच्या तेलापासून बनवलेल्या द्रवरूप साबणांची यासाठी निवड करण्यात आली जे उप-सहारा आफ्रि केत प्रचलित आहेत. हे साबण कीटकनाशकांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवतात असे दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news