प्रतीक्षा संपली! Apple ने जाहीर केला 2022 चा सर्वात मोठा इव्हेंट

प्रतीक्षा संपली! Apple ने जाहीर केला 2022 चा सर्वात मोठा इव्हेंट
Published on
Updated on

पुढारी ऑनलआईन: आता प्रतीक्षा संपली… कारण अॅपलने 2022 च्या सर्वात मोठ्या इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. हा विशेष कार्यक्रम (Apple Event) ७ सप्टेंबरला अॅपल पार्क, क्युपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथून थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. साथीच्या रोगांमुळे अॅपलचे सर्व इव्हेंट हे ऑनलाईनच प्रक्षेपित केले जाणार आहेत. अॅपल मीडियाने 'Far Out' या टॅगलाईनखाली या इव्हेंटचे आमंत्रण दिले आहे. हा इव्हेंट क्युपर्टिनोमध्ये सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. भारतीयांना हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार, रात्री १०.३० वाजता थेट पाहता येणार आहे.

हा इव्हेंट कुठे आणि कसा पहावा?

अॅपलचा हा स्पेशल इव्हेंट Apple ची अधिकृत वेबसाइट, Youtube चॅनेल, iphone, ipad, Mac आणि Apple TV वर थेट प्रक्षेपित (AppleEvent) केला जाणार आहे.

इव्हेंटमध्ये काय पाहाल?

या इव्हेंटमध्ये तुम्हाला iphone 14 ची सिरिज पाहायला मिळणार आहे. तसेच Apple Watch मॉडेल्स् आणि बरंच काही या इव्हेंटमध्ये (AppleEvent) तुम्हाला पहायला मिळू शकते. Apple चा इयरली इव्हेंट हा प्रत्येकवर्षी सप्टेंबर मध्ये आयोजित करण्यात येत असतो. iPhone 14 series हे या इव्हेंटचे खास आकर्षण असणार आहे. अॅपल लवकरच iPhone 14 चे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. अॅपलचे iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे प्रमुख रांगेत असणार आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news