French Open 2023 : जोकोविच ‘फ्रेंच ओपन’चा किंग, विक्रमी २३वे ग्रैंडस्लॅमवर मोहर

French Open 2023 : जोकोविच ‘फ्रेंच ओपन’चा किंग, विक्रमी २३वे ग्रैंडस्लॅमवर मोहर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने नॉर्वेच्या रूडचा पराभव करत फ्रेंच ओपन ग्रैंडस्लॅमवर आपली मोहर उमटवली आहे. सातव्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठणार्‍या जोकोविचने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकत विक्रमी २३वे ग्रैंडस्लॅमवर आपलं नाव कोरलं आहे. (French Open 2023)

पहिल्‍या सेटमध्‍ये जोकोविचचे कमबॅक

फ्रेंच ओपनच्या फायनल सामन्यात दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळी केली. यामध्ये रूडने जोकोविचची चांगलीच तारांभळ उडवली. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या जोकोविचने आपल्या नावाला साजेसा खेळ करत पुनरागमन केले पिछाडीवर असणाऱ्या जोकोविचने रूडची सर्विस मोडत ४-४ ची बरोबरी साधली. यानंतर टायब्रेकरमध्ये जोकोविचने ६-७ असा सेट जिंकला. सामन्यातील पहिला सेट ९० मिनिटांहून अधिक वेळ खेळण्यात आला.  (French Open 2023)

दुसरा सेटही जोकोविचच्या नावावर

दुसऱ्या सेटच्या सुरूवातीपासून दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळी केली. यामध्ये आपल्या शानदार खेळाचे प्रदर्शन करत जोकोविचने सेटमध्ये सलग तीन प‌ॉईंट मिळवले. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या रूडने चांगल्या खेळ करत तीन पॉंईंट मिळवले. परंतु पहिल्या सेटपासून लयीत असणाऱ्या जोकोविचने दुसरा सेट ३-६ पॉंईटने जिंकला.

रूडची झुंज अपयशी; सलग तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचचा विजय

पहिल्या दोन्ही सेट गमावल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये रूडने जोकोविचला कडवी झुंज दिली. तिसऱ्या सेटचा सुरूवातीला रूड ३-२ अशा फरकाने आघाडीवर होता. परंतु, जोकोविचने आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन करत खेळामध्ये कमबॅक करून सेट ५-७ अशा फरकाने रूडचा पराभव केला आणि  २३व्या ग्रैंडस्लॅमवर आपले नाव कोरले.

जोकोविचच्या नावे अनोख्या विक्रमची नोंद

जोकोविचने २३व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकून अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. जोकोविचने विजेतेपद जिंकून सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणारा खेळाडू बनला आहे. स्पॅनिश खेळाडू राफेल नदालने २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

फुटबॉल दिग्गजांची सामना पाहण्यास हजेरी

जोकोविच आणि रुड यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉल दिग्गजांनीही हजेरी लावली. फ्रेंच स्टार खेळाडू एम्बाप्पे आणि स्वीडनचा फुटबॉलपटू झलतान इब्राहिमोविचही आले होते. दोन्ही खेळाडू फ्रान्समधील पॅरिस सेंट-जर्मेनकडून क्लब स्तरावर खेळले आहेत. इब्राहिमोविचने नुकतीच फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. या दोन खेळाडूंशिवाय फ्रान्सचा ऑलिव्हर गिरौडनेही सामना पाहण्यासाठी हजेरी लावली.

हेही वाचा; 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news