‘इंडिया’ आघाडीला पाठिंबा नाही : कमल हसन यांनी स्‍पष्‍ट केली राजकीय भूमिका

प्रख्‍यात दाक्षिणात्‍य अभिनेते आणि मक्‍कल निधी मय्‍यम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हसन. ( संग्रहित छायाचित्र )
प्रख्‍यात दाक्षिणात्‍य अभिनेते आणि मक्‍कल निधी मय्‍यम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हसन. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रख्‍यात दाक्षिणात्‍य अभिनेते आणि मक्‍कल निधी मय्‍यम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी आज (दि.२१) आपली राजकीय भूमिका स्‍पष्‍ट केली. आम्‍ही सरंजामशाही राजकारणपासून दूर राहणार आहोत. आमचा पक्ष भाजप विरोधी इंडिया आघाडीला पाठिंबा देणार नाही. "निःस्वार्थपणे" राष्ट्राबद्दल विचार करतील याच्‍याशी आमची राजकीय युती होईल, असे त्‍यांनी जाहीर केले. मक्‍कल निधी मय्‍यम पक्षाच्‍या सातव्‍या वर्धापन दिन समारंभानंतर माध्‍यमांशी ते बोलत होते. ( Not Joined INDIA Bloc : Kamal Haasan )

यावेळी कमल हसन म्‍हणाले की, "मी यापूर्वीही सांगितले होते की तुम्हाला पक्षीय राजकारण नाकारावे लागणार आहे.  सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करावा लागेल. जो कोणी देशाबद्दल नि:स्वार्थपणे विचार करेल, याच्‍याशी माझा 'एमएनएम' पक्ष युती करेल. मात्र माझा पक्ष स्थानिक सरंजामी राजकारण करणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही." ( Not Joined INDIA Bloc : Kamal Haasan )

आगामी लोकसभा निवडणुकी द्रमुक पक्षाशी युती करणार का, याला उत्तर देताना ते म्‍हणाले, कोणाशी युती करावी याबाबत चर्चा सूरु आहे. याबाबतची माहिती लवकरच माध्‍यमांना दिली जाईल. ( Not Joined INDIA Bloc : Kamal Haasan )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news