Nora Fatehi : ‘बी हॅप्पी’ नोरा फतेही, अभिषेक बच्चनसोबतचा फॅमिली ड्रामा घेऊन येतोय रेमो डिसुझा

नोरा  फतेही
नोरा फतेही

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोरा फतेही अभिषेक बच्चनसोबत बी हॅप्पी या चित्रपटात झळकणार आहे. रेमो डिसुझाने या चित्रपटाचे (Nora Fatehi ) दिग्दर्शन केले आहे. याबद्दल एका वृत्तसंस्थेशी बोलताना नोरा फतेही म्हणाली, "हा खूप चांगला चित्रपट आहे. अभिषेक बच्चनसोबतचा हा एक कौटुंबिक नाटक आहे. हा एक अतिशय साधा आणि गोड चित्रपट आहे. मी याबद्दल उत्सुक आहे. रेमोने त्याचे दिग्दर्शन केले आहे आणि त्याने खूप चांगले काम केले आहे…" (Nora Fatehi)

नोरा फतेही
नोरा फतेही

नोरा फक्त आयटम नंबर पर्यंत मर्यादित राहिली नाहीये. तर या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्री असेल. 'बी हैप्पी' नंतर पुढील स्टेप साठी चर्चा होत होती आणि रेमोकडे एक कल्पना होती, यासाठी नोराने लगेच होकार दिला. याआधी नोराने रेमोचा चित्रपट स्ट्रीट डान्सरमध्येदेखील काम केले होते. या चित्रपटातील गाणे 'गर्मी'मधून नोराला खूप लोकप्रियता मिळाली होती. हे गाणे इतके हिट झाले होते की, प्रत्येक जण या गाण्याची हुक स्टेप करताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

'साकी साकी'चे ओरिजनल गाणे कोएना मित्राने केलं होतं. पण हे गाणे ऐकताच समोर येते ती म्हणजे नोर. नोरा फतेहीच्या 'साकी साकी' गाण्याचा डान्स आणि हुक स्टेप खूप व्हायरल आहे.

या गाण्यामुळे नोरा फतेही रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली. पण, नोराने सांगितले की, या डान्समुळे तिला काय काय सहन करावं लागलं. हे स्टेप्स करताना नोरा फतेहीची स्थिती इतकी बिघडली की, आजदेखील तिला फिजियोथेरेपी घ्यावी लागत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news