No Money for Terror: दहशतवाद संपेपर्यंत शांत बसणार नाही, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

No Money for Terror: दहशतवाद संपेपर्यंत शांत बसणार नाही, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

पुढारी ऑनलाईन : दहशतवादाला पुरवठा होणारा पैसा रोखण्याच्या उद्देशाने नो मनी फॉर टेरर (No Money for Terror) ही आंतरराष्ट्रीय परिषेद भारतात होत आहे. ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे. जगाची गंभीर दखल घेण्यापूर्वीच आपल्या देशाला दहशतवादाच्या भीतीचा सामना करावा लागला. अनेक दशकांतील दहशतवादाने वेगवेगळ्या प्रकारे भारताला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही या दहशतवादाविरूद्ध निखराने, धैर्याने लढा दिला आहे. पण आता हा दहशतवाद संपेपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. 'नो मनी फॉर टेरर' या आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेदरम्यान ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दहशतवादाचा नायनाट होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. बऱ्याच काळापासून दहशतवादाचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामध्ये पर्यटन, व्यावसायिक क्षेत्रावरदेखील या दहशतवादाचा परिणाम होत आहे. दहशतवादी हल्ल्यांचा सतत धोका असलेले क्षेत्र कोणालाही आवडत नाही. त्यामुळे लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली जात आहे. दहशतवादाच्या आर्थिक मदतीच्या मुळावर आपण प्रहार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जोपर्यंत दहशतवाद देशातून संपेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे मतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

दहशतवाद हा मानवता, स्वातंत्र्य आणि सभ्यतेवर हल्ला आहे. त्याला कोणत्याही देशाची सीमा ओळखता येत नाही. दहशतवादाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकता आणि सहिष्णुतेचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल, असे ते म्हणाले. दहशतवादी संघटनांना अनेक स्त्रोतांकडून निधी मिळतो हे सर्वांना माहीत आहे. याचा एक स्रोत कोणत्याही एका देशाचा पाठिंबा आहे. काही देश त्यांच्या परराष्ट्र धोरणांचा भाग म्हणून दहशतवादाचे समर्थन करतात. ते त्यांना राजकीय, वैचारिक आणि आर्थिक पाठबळ देतात. दहशतवादी फंडिंगचा एक स्रोत संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे असा घटनांना आळा घालणे हे दहशतवादाविरूद्धचे मोठे पाऊल असेही ते म्हणाले. (No Money for Terror)

पाहा व्हिडिओ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news