नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तरकाशीमधील सिल्कयारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका हा संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय बनला असताना बोगदा बांधकामातील कथित सहभागावरून सोशल मीडियावर अदानी समुहाला लक्ष्य करणारे आरोप सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर अदानी समूहाने आज (दि.२७) निवेदन जारी करून सिल्कियारा बोगद्याच्या बांधकामाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच याप्रकरणात होणाऱ्या आरोपांचा अदानी समुहाने निषेधही केला आहे. Uttarkashi Tunnel Rescue
सिल्क्यारा बोगदा हैदराबादच्या नवयुग इंजिनियरिंग कंपनीद्वारे बांधला जात आहे. मात्र, यात सोशल मीडियावर सुरू असलेल्या संदेशांमध्ये अदानी समुहाचा उल्लेख झाल्यामुळे या समुहाची अस्वस्थता वाढली आहे. राज्यसभेचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मिडियावर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उत्तर काशीमधील बोगद्याचे बांधकाम कोणत्या खासगी कंपनीतर्फे सुरू असून बोगदा कोसळला. तेव्हा कंपनीचे भागधारक कोण होते, अदानी समुहाचा देखील त्यात समावेश होता काय, असा सवाल सुब्रण्यम स्वामींनी केला होता. Uttarkashi Tunnel Rescue
त्यानंतर, सिल्कयारा बोगद्याच्या बांधकामाशी संबंधित कंपनीचे अदानी समूहाशी संबंध असून या बांधकाम कंपनीत अदानी समूहाचे समभाग आहेत, असे दावे करणारे संदेश सुरू झाले होते. त्यानंतर अदानी समूहाने एक निवेदन जारी करून हे आरोप फेटाळून लावले. तसेच बोगद्याच्या बांधकामाशी समूहाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. अदानी समूहाच्या निवेदनात म्हटले आहे, की समूहाचे बोगदा बांधकाम कंपनीत कोणतेही समभाग नाहीत. अदानी समूह किंवा समुहाच्या उपकंपन्यांचा बोगद्याच्या बांधकामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. एवढेच नव्हे तर, बोगदा बांधणाऱ्या कंपनीमध्ये देखील आपले समभाग नाहीत.
हेही वाचा