Nitish Kumar Wins Majority Test : बिहारमध्ये नितीश कुमार सरकार बहुमत चाचणीत ‘पास’

Nitish Kumar Wins Majority Test : बिहारमध्ये नितीश कुमार सरकार बहुमत चाचणीत ‘पास’
Published on
Updated on

पाटणा; पुढारी ऑनलाईन : प्रमुख विरोधी पक्ष भाजपने सभात्याग केल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार (Nitish Kumar Wins Majority Test) यांच्या महाआघाडी सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. नाममात्र औपचारिकता राहिलेल्या या प्रक्रियेत नितीश कुमार यांनी बहुमत चाचणी पास झाले. विश्वासदर्शक प्रस्तावापूर्वी नितीश कुमार यांनी पूर्वीचा मित्रपक्ष भाजप व त्यांच्या केंद्रीय नेतृत्त्वावर सडकून टीका केली.

 विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Wins Majority Test) यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडला संपवण्याचा कट भाजपने रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पूर्वी चार पक्ष होते पण आज आठ पक्ष आमच्यासोबत आहेत. नंदकिशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष करा, असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र विजय सिन्हा यांना केले.

 2020 मध्ये मी मुख्यमंत्री होणार नव्हतो, भाजपच्या दबावाखाली बनावे लागले. मला काहीही बनण्याची इच्छा नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूला संपवण्याचे षडयंत्र रचले, भाजपने सर्व जुन्या नेत्यांना बाजूला केले आहे." भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही (भाजप) कुठे होता. ते म्हणाले की, भाजपचे काम फक्त अस्वस्थता निर्माण करणे आहे.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना नितीश कुमार (Nitish Kumar Wins Majority Test) म्हणाले, केंद्राने पाटणा विद्यापीठाची मागणीही मान्य केली नाही. 2017 मध्ये केंद्राने 600 कोटी दिले आणि सांगितले की, समजा प्रत्येक घरात नळ असेल तर केंद्राची योजना आहे, पण आम्हाला ते मान्य नव्हते. 'हर घर नल'ची सुरुवात 2015 मध्ये झाली होती, त्यावेळी RJD हा एकमेव मित्र होता. बिहारमध्ये रस्तेबांधणी राज्य सरकारने केली, केंद्र सरकारने नाही, अटलजी आजारी पडले तर अडवाणीजींना सत्ता मिळायला हवी होती, पण तसे झाले नाही.

माझ्याविरोधात बोलाल तरच तुम्हाला केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळेल, असा गदारोळ करणाऱ्या भाजप नेत्यांना नितीशकुमार म्हणाले. भाजपच्या बहिष्कारावर नितीश कुमार म्हणाले की, तुम्हाला वरून सांगण्यात आले असेल म्हणून तुम्ही लोक बाहेर गेलात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news