गोंडवाना विद्यापीठात मायनिंगसाठी प्रशिक्षण : नितीन गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली जिल्‍ह्यातील मायनिंगच्‍या बाजुला स्‍टील उद्योग सुरू करता येईल व त्‍यासाठी लागणारे कुशल मनुष्‍यबळ तयार करण्‍यासाठी गोंडवाना विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम राबवता येतील. स्‍थ‍ानिक युवकांना प्राधान्‍य दिल्‍यास मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्‍त होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला.

संबंधित बातम्या 

असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट (एड) च्‍यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव ऍडव्‍हांटेज विदर्भाचे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या परिसरात आयोजन करण्‍यात आले आहे. आज समारोपाच्‍या दिवशी सकाळच्‍या सत्रात 'इमर्जिंग हब फॉर मायनिंग ओरिजनल एक्‍वीपमेंट मॅन्‍युफॅक्‍चरर' विषयावरील चर्चेत ते बोलत होते.

यावेळी ज‍ितेंद्र नायक, लॉयड्स मेटल अँड एनर्जीचे बी. प्रभाकरण, कोमात्‍सू मायनिंगचे सोमनाथ दत्‍ता मजुमदार, एसएमएस ग्रुपचे आनंद संचेती, एमईसीएलचे इंद्रा देव नारायण, कॉम्‍पेन्‍सस कंपनी पोलंडचे मात्‍यूज वोरा, व्‍हॉल्‍वो इंड‍ियाचे दिम‍ित्रोव कृष्‍णन यांची उपस्‍थ‍ित होते. गडच‍िरोलीमध्‍ये चांगल्‍या प्रतीचे आयर्न उपलब्‍ध असून तेथे एक चांगले स्‍टील मॅन्‍युफॅक्‍चरींग हब तयार होऊ शकतो, असेही नितीन गडकरी म्‍हणाले.

नागपूर 'लॉज‍िस्‍टीक कॅपिटल' होऊ शकते

नागपुरात मिहान सेझसारखी उत्‍तम औद्योगिक वसाहत असून, चांगल्‍या पायाभूत सुविधा आहेत. वीज, २४ बाय सेवन पाणी, सिंदी ड्रायपोर्टसारखे लॉजिस्‍टीक हब असून देशभरात कुठेही मालवाहतूक केली जाऊ शकते. त्‍यामुळे भविष्‍यात नागपूर हे 'लॉज‍िस्‍टीक कॅपिटल' होऊ शकते. त्‍यामुळे गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. 'डेव्‍हलपमेंट ऑफ लॉजिस्‍टीक अँड वेअरहाऊसिंग इंडस्‍ट्री इन विदर्भ रिजन' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

या सत्राला आर अँड वाय लॉज‍िस्‍टीकचे शिव कुमार राव, कोईन कन्‍सल्‍टींगचे आरिफ सिद्धीकी, नॅशनल हायवे लॉजिस्‍टीकचे के. साईनाथन, मॅनकाइंड फार्माचे भारत भूषण राठी, रिलायबल कार्गोचे सुधीर अग्रवाल, गोदाम लॉज‍िस्‍टीकचे महावीर जैन, लॉजिस्‍टीक पार्क इंड‍ियाचे विरेन ठक्‍कर यांचा सहभाग होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news