लव्ह जिहादवरून नितेश राणे- अबु आझमी यांच्यात खडाजंगी

लव्ह जिहादवरून नितेश राणे- अबु आझमी यांच्यात खडाजंगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लव्ह जिहादवरून भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आज (दि.१४) विधीमंडळाच्या बाहेर आमनेसामने आले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर राणे यांनी माध्यमांशी बोलताना आझमी यांच्या लव्ह जिहादबाबतच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले की, लव्ह जिहाद आणि धर्मांकर या बाबत मी खरी माहिती देत आहे, हे त्यांना खटकले आहे. त्यामुळे त्यांची तडफड होत आहे, त्यामुळे ते माझ्या जवळ आले, त्यांची पोलखोल होईल, याची भीती त्यांना वाटत आहे. परंतु, आपल्या हिंदू तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, तेव्हा हे जबाबदारी घेतील का ? यांच्या हरकतीमुळे अशा लोकांना मदतच होत आहे. हे त्यांना कळत नाही. लव्ह जिहादवरून हिंदू तरुणींचे आयुष्य बरबाद होऊल तेव्हा हे पुढे येतील का ? यांच्या सारखा ज्येष्ठ माणूस मुलींचे आयुष्य बरबाद करत असेल, तर हे योग्य नाही, असा संताप भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news