Nitasha Biswas : निताशा बिस्वास ठरली भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर सौंदर्य स्पर्धेची विजेती, जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवास

निताशा बिस्वास ठरली भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर सौंदर्य स्पर्धेची विजेती, जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवास
Nitasha Biswas
Nitasha Biswas : निताशा बिस्वास ठरली भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर सौंदर्य स्पर्धेची विजेती, जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवासNitasha Biswas
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकत्यातील निताशा बिस्वास (Nitasha Biswas), भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर सौंदर्य स्पर्धेची विजेती ठरली आहे. नताशाचा आतापर्यंतचा प्रवास हा संघर्षमय राहिला आहे. निताशाचं स्वप्न आहे तिला एक राजकारणी व्हायचं आहे. भेदभाव संपवायचा आहे. जाणून घेऊया भारतातील पहिली ट्रान्सजेंडर सौंदर्य स्पर्धेची विजेती निताशा बिस्वास बद्दल…

Nitasha Biswas : वयाच्या सहाव्या वर्षी आईला गमावलं

कोलकात्यातील एका सर्वसामान्य कुटूंबात सुवान्को (ट्रान्सजेंडर होण्यापूर्वीचे नाव) या मुलाचा जन्म झाला. सुवान्कोने वयाच्या ६ व्या वर्षी त्याची आई गमावली. घरी भाऊ आणि बाबा होते. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहे यावर चर्चा करणे, मनमोकळेपणाने भावाशी बोलणे कठीण होते. वडिलांना सुद्धा याबद्दल समजवणे कठीण होते. पहिल्यांदा जेव्हा सुवान्कोने आपल्या भावाला पहिल्यांदा ट्रान्सजेन्डर विषयी आपल्यातील बदलावांबद्दल सांगितले. तेव्हा त्याने विरोध केला. नंतर हे सर्व चुकीचे आहे, तू असं वर्तन करू शकत नाहीस म्हणत वडिलांनीही विरोध केला.

बाथरूममध्ये कोंडून घ्यायची

निताशा सांगते, तिला लहानपणापासूनच माहित होते की ती इतरांपेक्षा वेगळी आहे. घरी असो किंवा शाळेत, निताशाला ट्रान्सजेंडर पूर्वीचा सुवान्कोला जेव्हा मुलांना ज्या गोष्टी करायला सांगितल्या गेल्या जात होत्या. त्यामध्ये तिला काहीच रस नव्हता. शाळेत, जेव्हा तिला मैदानावर जबरदस्तीने फुटबॉल खेळायला लावलं जायचं तेव्हा ती बाथरूममध्ये कोंडून घेत असे. तिला खेळणं आवडायचं नाही.

बालपणी आपल्या वर्तनाबदद्ल ती गोंधळून जायची. दिल्लीत आपली एक ओळख निर्माण करण्यासाठी आली. दिल्लीत आल्यावर तिची 'ओळख' बदलली. पण दरम्यानचा प्रवास हा परिवर्तनाचा आणि गुंतागुंतीचा होता. तिच्यावर उपचार सुरू झाले. ही प्रक्रिया खूप अवघड होती. "ही एका रात्रीची प्रक्रिया नव्हती असं निताशा सांगते.

Nitasha Biswas : कामाच्या ठिकाणी भेदभाव

कामाच्या ठिकाणीही निताशाला अपमानास्पद वागणूक मिळे, भेदभावाचा सामना करावा लागे. ती एक आपली आठवण सांगते, मित्रांच्यासह पार्टीला जायचो. तेव्हा त्यांना मी कोण हे माहित नव्हते तेव्हा त्यांचे वर्तन चांगले आसायचे पण जेव्हा मी कोण आहे हे समजले तेव्हा त्यांचे माझ्यासोबतचे वर्तन बदलले.

सर्वात मोठी प्रशांसा

दिल्लीत निताशावर उपचार झाले. उपचारानंतर ती पहिल्यांदाच कुटुंबीयांना भेटायला गेली. तिच्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट घडली, ही गोष्ट निताशाला आतापर्यंतची सर्वोत्तम प्रशंसा होती. जेव्हा तिच्या मावशीने तिला पाहिले तेव्हा तिने खुलासा केला की ती तिच्या आईसारखी दिसते.

शरीररचनेचा अभ्यास केला जातो पण ट्रान्सजेंडरचा नाही

समाजात खरा बदल घडवून आणायचा असेल तर, भेदभाव संपवायचा असेल तर, सुरुवात शालेय शिक्षणापासून व्हायला हवी. लोकांमध्ये ट्रान्सजेंडर्सबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दूर करायला हवेत. सर्वात मोठा बदल शाळेपासून सुरू झाला पाहिजे. स्त्री-पुरुषांच्या शरीररचनेचा अभ्यास केला जातो पण ट्रान्सजेंडरचा नाही. समाजातील हा भेदभाव नष्ट करणे आवश्यक आहे. हा विषय आपल्या शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग हवा. ती खरी सुरुवात असेल.

Nitasha Biswas : तिला राजकारणी बनायचं आहे

निताशाने 2017 मध्ये, निताशाने मिस ट्रान्स क्वीन इंडिया सौंदर्य स्पर्धा जिंकली. नताशा आपल्या स्वप्नांबद्दल सांगते की, "जरी मला OTT प्लॅटफॉर्मवरून अनेक ऑफर मिळत असल्या तरी, मला राजकारणी बनायचं आहे. निर्णयक्षमतेचा एक भाग व्हायचं आहे. जेणेकरून मी देशातील भेदभावाच्या समस्येकडे लक्ष देऊ शकेन,"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news