Nissan Magnite EZ Shift | निसानची नवीन एसयुव्ही लॉंच; ६.५० लाखांच्या सर्व गाड्यांना देणार टक्कर

Nissan Magnite EZ Shift | निसानची नवीन एसयुव्ही लॉंच; ६.५० लाखांच्या सर्व गाड्यांना देणार टक्कर

पुढारी ऑनलाईन डेस्क : निसान इंडिया मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय सब-4 मीटर SUV मॅग्नाइटची AMT आवृत्ती काल (10 ऑक्टोबर) लॉंच केली. कंपनीने याला Easy-Shift असे नाव दिले आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह भारतातील ही सर्वात स्वस्त SUV कार असेल अशी माहिती कंपनीने दिलेली आहे. (Nissan Magnite EZ Shift) जाणून घेऊया या कारबाबत अधिक माहिती.

मॅग्नाइट इझी-शिफ्ट चार प्रकारांमध्ये XE, XL, XV आणि XV मध्ये ऑफर केली जात आहे. हे सर्व प्रकार ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AMT) सह सुसज्ज आहेत. डिझाईन आणि फिचर्समुळे निसानची नवीन ही एसयुव्ही खूपच चर्चेत आली आहे. (Nissan Magnite EZ Shift)

निसानच्या नवीन एसयुव्हीची किंमत | Price of Nissan's new SUV Magnite EZ Shift

एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 6,49,900 रुपये आहे. इतर व्हेरियंटच्या किमती जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. निसानचा दावा आहे की मॅग्नाइट ही इझी-शिफ्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AMT) सह भारतातील सब-4 मीटर SUV सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे.

भारतीय बाजारपेठेत ती टाटा पंच आणि ह्युंदाई एक्सेटरशी स्पर्धा करते. Tata Punch AMT ची एक्स-शोरूम किंमत 7.5 लाख रुपये आणि Hyundai Xcent AMT ची एक्स-शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरू होते. निसान मोटर इंडियाने कारचे बुकिंग सुरू केले आहे. खरेदीदार 11,000 रुपये टोकन मनी देऊन ही कार बुक करू शकतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news