निपाणी : शरद पवारांची निपाणीत हाेणार जाहीर सभा; महाराष्‍ट्रातील नेतेमंडळींची उपस्‍थिती

निपाणी : शरद पवारांची निपाणीत हाेणार जाहीर सभा; महाराष्‍ट्रातील नेतेमंडळींची उपस्‍थिती

निपाणी : पुढारी वृत्तसेवा कर्नाटक विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ निपाणीत थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या भव्य पटांगणावर सभा होणार आहे.
यावेळी शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि.10 रोजी मतदान होणार आहे. यामध्ये निपाणी मतदारसंघासाठी प्रथमच राष्ट्रवादीने युवा नेते उत्तम पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

आतापर्यंत उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री,आ.हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, रोहित पवार, माजी आ.के पी पाटील, राजू आवळे, गोकुळचे संचालक नावीद मुश्रीफ, युवा नेते रोहित पाटील यांच्या जाहीर प्रचार सभा झाल्या आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर प्रचार सभेची प्रतीक्षा लागून होती. त्यानुसार थोड्याच वेळात शरद पवार यांची जाहीर सभी होणार आहे. या सभेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला सभास्थळी दाखल होत आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात यंदा प्रथमच विधानसभेसाठी नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, निपाणी येथील सभेसाठी शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याने ते या सभेत नेमके काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news