पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते निखिल आडवाणी यांचा बहुप्रतीक्षित 'फ्रिडम ॲट मिडनाईट' या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. या पॉलिटिकल ड्रामामध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलन आणि ब्रिटिशद्वारा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या दरम्यानच्या समोर न आलेल्य़ा कहाण्या आणि महत्वपूर्ण क्षणांना दाखवण्यात येईल. हिंदी सिनेमातूनच स्वतंत्रता आंदोलन आणि स्वातंत्र्यसेनानींवर चित्रपट आले आहेत. या चित्रपटातून फाळणीच्या वेळचे अनेक दु:ख देखील पाहायला मिळाले आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष पाहायला मिळाला आहे. मातृभूमीसाठी आपले बलिदान देणाऱ्या वीर देशभक्तांवरदेखील बॉलीवूडने असंख्य चित्रपट बनवले आहेत. आता निर्माते निखिल आडवाणी या मुद्द्यांवर वेब सीरीजसोबत घेऊन हजर होत आहेत. या वेब सीरीजला सोनी लिव्हवर प्रसारीत केलं जाईल.
कलाकारांबद्दल सांगायचे झाल्यास सिद्धांत गुप्ता पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या भूमिकेत आहे. चिराग वोहरा महात्मा गांधी आणि राजेंद्र चावला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत दिसतील.
ही सीरीज लॅरी कॉलिन्स आणि डोमिनिक लॅपिएर यांचे पुस्तक 'फ्रिडम ॲट मिडनाईट'वर आधारित आहे.