‘निकम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; शिल्पा आणि अभिमन्यू प्रमुख भूमिकेत

‘निकम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; शिल्पा आणि अभिमन्यू प्रमुख भूमिकेत
Published on
Updated on

पुढारी आऑनलाईन डेस्क : शिल्पा शेट्टीच्या 'निकम्मा' चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रीलिज करण्यात आला. शिल्पाने म्हटले आहे की निकम्मा होना इज आर्ट…माय फूट! अब देखो ये 'अवनी' कैसे लगाती है इसकी वाट! या चित्रपटात शिल्पाने सुपरहीरोईनची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता अभिमन्यु दसानी (Abhimanyu Dasani) हा जबदस्त लूकमध्ये दिसत आहे.

ट्रेलरमध्ये रोमान्स, कॉमेडी, इमोशन आणि ॲक्शन असा कम्पलीट पॅकेज असणारा हा चित्रपट 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एक आळशी, कामचुकार तरुण (अभिमन्यू दासानी) याला जबाबदार व्यक्‍ती बनवण्यासाठी ती त्याच्या जीवनात प्रवेश करते. बर्‍याच दिवसांनंतर शिल्पा यानिमित्ताने रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. गायिका शिर्ले सेतियाही या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण करीत आहे

अभिमन्यु दसानी याच्या आयुष्यात जेव्हा शिल्पाची एन्ट्री होते. तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतात? तो कसा बदलतो? हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. शिल्पा ही या चित्रपटामध्ये सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी यांच्यासोबतच शर्ली सेतिया, सुनील ग्रोवर आणि समीर सोनी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. शर्ली आणि अभिमन्यु यांचा रोमँटिक अंदाज या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

शिल्पाने फोटो पोस्ट करून लिहिले की… 'आता आम्ही येत आहोत एका नव्या अवतारात! खरी 'अवनी' कोण आहे? या चित्रपटात शिल्पासह भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि शिर्ले सेतियाही आहे. शब्बिर खान यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

'निकम्मा' हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार होता पण कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेल्या 'मिडिल क्लास अब्बाई' या तेलगु चित्रपटाचा रिमेक आहे. सब्बीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. अभिमन्यु दसानी हा अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आहे. त्यानं 2018 साली प्रदर्शित झालेल्या मर्द को दर्द नही होता या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

शिल्पा शेट्टीचा हा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. यापूर्वी शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील झाली आहे. आता तिचा हा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे, 'आणखी एक मोठा धमाका.' तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले – 'वेलकम बॅक क्वीन.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news