Niger Crisis : लवकरात लवकर नायजर सोडा, परराष्ट्र मंत्रालयाच्या भारतीय नागरिकांना सूचना

Niger Crisis
Niger Crisis

पुढारी ऑनलाईन डेस्क : नायजरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाऱ्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने तेथे राहत असलेल्या भारतीय नागरिकांना शुक्रवारी (दि.११) आफ्रिकन देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. ज्या भारतीयांना नायजरमध्ये राहण्याची गरज नाही त्यांनी लवकरात लवकर तो देश सोडावा, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने जारी केला आहे. (Niger Crisis) परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत सरकार नायजरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्याची परिस्थिती पाहता, ज्या भारतीय नागरिकांना नायजरमध्ये राहणे गरजेचे नाही, त्यांनी लवकरात लवकर देश सोडावा, असे सांगण्यात आले आहे. (Niger Crisis)

देशाचे हवाई क्षेत्र बंद (Niger Crisis)

निवेदन प्रसिद्ध करताना बागची म्हणाले, 'नायजरमधील हवाई क्षेत्र सध्या बंद आहे आणि जमिनीच्या सीमेवरून प्रवास करणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत जे लोक नायजरला भेट देण्याचा विचार करत आहेत. त्यांनी तेथील परिस्थिती सामन्या होईपर्यंत आपला दौरा पुढे ढकलावा.

नायजरमध्ये २५० भारतीयांचे वास्तव (Niger Crisis)

आफ्रिकन देश नायजरमध्ये किती भारतीय नागरिक आहेत असे त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तेथे सुमारे २५९ भारतीय आहेत. त्यांनी सर्वांनी नोंदणी करावी अशी आमची इच्छा आहे. ते सर्व सुरक्षित आहेत. भारतीय दूतावास त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी आणि रसद पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. (Niger Crisis)

सत्ता पालटल्यानंतर युद्धसदृश्य परिस्थिती (Niger Crisis)

दोन आठवड्यांपूर्वी नायजरमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बजौम यांना लष्कराने पदच्युत केले होते. मात्र, बजोम यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सत्ता पालटानंतर तेथे युद्धसदृश परिस्थिती आहे. विशेष म्हणजे पश्चिम आफ्रिकन देश या सत्तापालटामुळे संतप्त झाले असून ते नायजरला लष्करी कारवाईचा इशारा देत आहेत.(Niger Crisis)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news