रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण, संशयिताला अटक नाही : ‘NIA’चे निवेदन जारी

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरण, संशयिताला अटक नाही : ‘NIA’चे निवेदन जारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बंगळूरमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आराेपीला अटक केल्‍याचे वृत्त होते. मात्र अशा प्रकारची कारवाई करण्‍यात आली नसल्‍याचे राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) एका निवदेनात स्‍पष्‍ट केले. रामेश्वरम कॅफेतील स्फोटप्रकरणी 'एनआयए'ने एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली हाेती. संशयिताचे नाव शब्बीर असे असल्‍याचे सांगितले हाेते. त्याला कर्नाटकातील बल्लारी येथून ताब्यात घेण्याच आल्‍याचेही वृत्त होते.

१ मार्च रोजी बंगळूर येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फोटात १० जण जखमी झाले होते. कॅफेत टायमरचा वापर करून आयईडी बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. पोलिसांनी मुख्य संशयित दिसत असलेले अनेक सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले होते. १ मार्च रोजी ३० वर्ष वयाचा एक संशयित व्यक्ती कॅफेमध्ये इडलीची प्लेट घेऊन जात असल्याचे दिसून आले होते. त्यांच्या खांद्याला एक बॅग दिसून आली होती. त्यात आतमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचा संशय होता. दुसऱ्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोच संशयित बॅग घेऊन रेस्टॉरंटकडे जाताना दिसला होता.

NIA ने संशयिताची कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होतेरामेश्वरम कॅफे ८ मार्च रोजी पुन्हा सुरू झाला होता. (Bengaluru Rameshwaram Cafe Blast) राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख संशयिताला अटक केल्याचे अनेक सूत्रांनी वृत्त दिल्यानंतर 'एनआयए'ने याचा एक निवदेन जारी करुन अशा प्रकारे कोणतीही कारवाई करण्‍यात आली नसल्‍याचे म्‍हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news