Bracewell : न्यूझीलंडचा ब्रेसवेल आगामी वन डे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

Bracewell : न्यूझीलंडचा ब्रेसवेल आगामी वन डे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
Published on
Updated on

वेलिंग्टन; वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकल ब्रेसवेलला उजव्या तळपायाची दुखापत झाली असून यामुळे तो भारतात होणार्‍या आगामी आयसीसी वन डे विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने बुधवारी जाहीर केले. ब्रेसवेलला इंग्लिश टी 20 ब्लास्ट स्पर्धेत वर्सेस्टरशायर रॅपिडस् संघाकडून खेळताना दुखापत झाली. त्याच्यावर गुरुवारी बि—टनमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. 32 वर्षीय फिरकी अष्टपैलू मायकल ब्रेसवेलला यातून सावरण्यासाठी किमान 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे. (Bracewell)

'एखाद्या खेळाडूला दुखापत झाली आणि त्यातही या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेसारख्या इव्हेंटमध्ये खेळता येणार नसेल तर तो किती मोठा धक्का असू शकेल, याची आपण कल्पना करू शकतो,' असे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी एका पत्रकातून नमूद केले. मायकल ब—ेसवेलनेही दुखापतीमुळे आपली निराशा झाली असल्याचे सांगितले. सध्या यातून शक्य तितक्या लवकर सावरण्याचा प्रयत्न असेल, असे तो याप्रसंगी म्हणाला. (Bracewell)

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news