न्‍यूझीलंड विरुद्ध श्रीलंकेचा पराभव, कसोटी ‘चॅम्‍पियनशीप’ फायनलमध्‍ये टीम इंडियाची धडक

केन विलियमसन यांनी दमदार फलंदाजीच्‍या जोरावर कसोटी मालिकेतील पहिल्‍यासामन्‍यात न्‍यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला.
केन विलियमसन यांनी दमदार फलंदाजीच्‍या जोरावर कसोटी मालिकेतील पहिल्‍यासामन्‍यात न्‍यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केला.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : न्‍यूझीलंड विरुद्धच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. यामुळे आता कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या फायलनमध्‍ये पोहचण्‍याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. पराभवामुळे श्रीलंकेचे चॅम्‍पियनशीपच्‍या फायलनमध्‍ये पोहचण्‍याचे स्‍वप्‍न धुळीस मिळाले आहे ( New Zealand vs Sri Lanka ) जाणून घेवूया नव्‍या समीकरणाविषयी…

New Zealand vs Sri Lanka : श्रीलंकेचा पराभव भारताच्‍या पथ्‍यावर!

गुणतालिकेत अग्रस्‍थानी असणारा ऑस्‍ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीप फायनलमध्‍ये यापूर्वीच पोहचला आहे. भारत दुसर्‍या तर श्रीलंका तिसर्‍या स्‍थानी होते. श्रीलंकेला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागणार होते. तर भारताला अहमदाबाद येथे सुरु असलेल्‍या ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध च्‍या चौथ्‍या कसोटीत विजय मिळवणे अनिवार्य होते. भारत- ऑस्‍ट्रेलियामधील चौथ्‍या कसोटी सामन्‍याच्‍या निकाला आधीच श्रीलंकेचा मालिकेतील पहिल्‍याच सामन्‍यात पराभव झाला आहे. त्‍यामुळे आता भारताचे गुणतालिकेतील दुसरे स्‍थान अबाधित राहिले आहे. त्‍यामुळे कसोटी क्रिकेट चॅम्‍पियनशीपच्‍या फायलनमध्‍ये भारताने धडक मारल्‍याचे स्‍पष्‍ट झाले असून, कसोटी क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात सलग दुसर्‍यांदा टीम इंडिया पोहचली आहे.

न्‍यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्‍यात काय घडलं ?

मालिकेतील पहिल्‍या कसोटी सामन्‍यात न्‍यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा पहिला डाव ३५५ धावांमध्‍ये संपुष्‍टात आला. न्‍यूझीलंडच्‍या पहिल्‍या डावाची सुरुवात खराब झाली होती. ५ गडी गमावत १६५ धावा केल्‍या. यानंतर डॅरेल मिशेल याने दमदार शतक झळकावले. मिशेलच्‍या खेळीमुळे न्‍यूझीलंडचा संघाने पहिल्‍या डावात ३७३ धावापर्यंत मजल मारली. तसेच पहिल्‍या डावात १८ धाांची आघाडीही घेतली. श्रीलंका संघाचा दुसऱ्या डाव ३०२ धावांवर आटोपला.

मिशेल- विलियमसनच्‍या भागीदारीने न्‍यूझीलंडचा विजय सुकर

न्‍यूझीलंडला मालिकेतील पहिली कसोटी जिंकण्‍यासाठी २८५ धावांचे आव्‍हान होते. टॉम लॅथमनंतर डॅरिल मिशेल आणि केन विलियमसन यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत न्‍यूझीलंडचा विजयाचा मार्ग सुकर केला. मिशेल ८१ धावांवर बाद झाला.

New Zealand vs Sri Lanka : केन विलियमसनचे तडाखेबाज शतक

पहिल्‍या कसोटी सामन्‍यातील दुसर्‍या डावात न्‍यूझीलंडच्‍या केन विलियमसन याने शतकी खेळी केली. एकीकडे विकेट जात असताना त्‍याने प्रथम डॅरिल मिशेलच्‍या जोडीने दुसर्‍या डावाला आकार दिला.  केन याने १७७ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्‍या जोरावर आपले शतक पूर्ण केले. त्‍याच्‍या नाबाद १२१ धावांमुळे न्‍यूझीलंडने दुसर्‍या डावात आठ गडी गमावत २८५ धावाचे लक्ष्‍य पूर्ण करत मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात दिमाखदार विजयाची नोंद केली.

दुसर्‍या डावात श्रीलंकेच्‍या गोलंदाजांचे शर्थीचे प्रयत्‍न

दुसर्‍या डावात श्रीलंकेच्‍या गोलंदाजांनी न्‍यूझीलंडला रोखण्‍याचे शर्थीचे प्रयत्‍न केले. दुसर्‍या डावात श्रीलंकेच्‍या असिथा फर्नांडो ३ आणि प्रभात जयसूर्या दोन तर कसून रजिथा आणि लाहिरू कुमारा यांनी प्रत्‍येकी एक विकेट घेतली. मात्र अखेरपर्यंत केन विलियमसन केलेल्‍या झूंझार फलंदाजीमुळे श्रीलंकेचा विजय हिरावला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news