Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर 3’ मध्ये नव्या पात्राची एन्ट्री; कथेत नवं ट्विस्ट

मिर्झापूर 3
मिर्झापूर 3

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मिर्झापूर ३'च्या सीझनची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रसिद्ध वेब सीरीजचा दुसरा भाग २०२० मध्ये आला होता. तेव्हापासून 'मिर्झापूर ३'ची चर्चा आहे. निर्मात्यांनी अद्याप त्याच्या रिलीजच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी, त्याच्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. (Mirzapur Season 3) 'मिर्झापूर 3' मध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे, जी कथेत एक महत्त्वाचा ट्विस्ट आणणार आहे. या नव्या पात्राचे नाव काय असेल, हे सध्यातरी कळलेले नाही. सूत्रांनुसार, 'ही व्यक्तिरेखा अभिनेता पल्लव सिंग साकारणार आहे.' (Mirzapur Season 3 )

'मिर्झापूर 3'मध्ये मुन्ना भैय्या दिसणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत अनेक नवीन व्यक्तिरेखा झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. पल्लव सिंग हे देखील या पात्रांपैकी एक आहे. तथापि, नवीन प्रवेश किंवा पल्लव सिंगच्या व्यक्तिरेखेबद्दल निर्मात्यांनी अद्याप कोणतीही सांगितलेले नाही. पण 'मिर्झापूर ३' च्या कथेत पल्लव सिंगच्या व्यक्तिरेखेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे म्हटले जात आहे.

नव्या पात्राची एन्ट्री एक अज्ञात ताकदवर व्यक्तीच्या भूमिकत होईल. अपडेट माहितीनुसार, य सीरीजचा चौथा सीजन देखील येईल, त्यावर काम सुरू झालेले आहे.

काय असेल पल्लव सिंहची भूमिका?

सूत्रांनुासर, पल्लव सिंह 'मिर्जापूर ३' मध्ये अशा एका कविच्या भूमिकेत असेल, जो कविता लिहितो. पण जो त्याच्याशी पंगा घेतो, तेव्हा पल्लव सिंह एक खूंखार रूप घेतो. असं रुप, ज्याच्याबद्दल सर्वजण अज्ञात असतात. 'मिर्जापूर ३' मध्ये आता मुन्ना असणार नाही, त्यामुळे हा कवी किती भयानक रुप घेतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news