भारतीय दंड संहिता (IPC) आणि फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये (Code of Criminal Procedure – CrPc) लवकरच मोठे बदल – अमित शहा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन – भारतीय दंड संहिता (Indian Penal Code – IPC) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Procedure – CrPC) यामध्ये सुधारणा करण्यात येणार असून यासाठीचे मसुदे संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाणार आहेत, अशी माहिती गृहमंत्र अमित शहा यांनी दिली आहे.

IPC आणि CrPCमध्ये यांच्यात सुधारणा करण्यासाठी बऱ्याच सूचना आल्या आहेत. त्यांचा विचार करून हा मसुदा बनवण्यात आला आहे, हा मसुदा बनवण्यासाठी फार मोठा वेळा दिला गेला आहे. लवकरच हे दोन्ही मसुदे दोन्ही सभागृहात सादर केले जातील, असे शहा म्हणाले.

हरियाण येथे देशातील सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांचे चिंतन शिबिर सुरू आहे, त्यात त्यांनीही माहिती दिली. याशिवाय प्रत्येक राज्यात National Investigation Agencyची शाखा स्थापन केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

मे २०२०मध्ये गृहमंत्रायलाने भारतातील फौजदारी कायद्यांत सुधारणा सुचवण्यासाठी ५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. नॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राध्यापक रणबीर सिंग या समितीचे अध्यक्ष आहेत. सध्याच्या फौजदारी कायद्यांत विविधता आणि पारदर्शकतेचा अभास असल्याचे या समितीने सुरुवातीला स्पष्ट केले होते. नव्याने मसुदा बनवण्यासाठी ज्या सूचना आलेल्या आहेत, त्या सर्वांची दखल समितीने घेतली असून संबंधित मसुदा हा समितच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news