‘जेम्स वेब’ने टिपली सर्वात दूरच्या तार्‍याची नवी प्रतिमा

‘जेम्स वेब’ने टिपली सर्वात दूरच्या तार्‍याची नवी प्रतिमा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या 'नासा' तसेच युरोपियन स्पेस एजन्सीच्या 'हबल' या अंतराळ दुर्बिणीने गेल्या तीन दशकांच्या काळात अनेक ग्रह-तार्‍यांच्या प्रतिमा टिपलेल्या आहेत. त्यामध्येच ब्रह्मांडातील सर्वात दूरवरच्या तार्‍याच्याही प्रतिमेचा समावेश आहे. ही प्रतिमा मार्च 2022 मध्ये टिपण्यात आली होती. 'नासा'ने पुढाकार घेऊन नवी 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप' बनवली.

या कामी 'नासा'ला युरोपियन स्पेस कंपनी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचेही सहकार्य मिळाले होते. 'हबल'ला जे खगोल दिसत नव्हते किंवा अस्पष्ट दिसत होते असे दूरस्थ खगोलही जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीच्या सहाय्याने कॅमेर्‍यात स्पष्टपणे टिपून घेता येऊ शकतात. आता या 'जेम्स वेब'ने याच तार्‍याची अधिक स्पष्ट व तपशीलवार प्रतिमा टिपली आहे.

हा मोठा 'बी-टाईप' तारा आहे. तो आपल्या सूर्याच्या तुलनेत दुपटीने अधिक उष्ण असून दहा लाख पटीने अधिक तेजस्वी आहे. या तार्‍याचे नाव 'डब्ल्यूएचएल 0137-एलएस' असे आहे. त्याला 'इरेंडेल' असे 'निकनेम'ही आहे. 'सनराईज आर्क' नावाच्या आकाशगंगेतील हा तारा आहे. त्याच्यापासून आलेला जो प्रकाश आपल्याला आता मिळाला आहे त्याने 12.9 अब्ज वर्षांपूर्वी प्रवासाला सुरुवात केली होती. याचा अर्थ 'बिग बँग' या महाविस्फोटानंतर एक अब्ज वर्षांनंतर या तार्‍याने प्रकाशकिरणे उत्सर्जित करण्यास सुरुवात केली. या महाविस्फोटानंतरच ब्रह्मांडाची निर्मिती व विस्तार सुरू झाला असे मानले जाते. 'इरेंडेल' हा तारा सध्या पृथ्वीपासून 28 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याच्या सध्याच्या विशिष्ट जागेमुळे त्याची अशी प्रतिमा टिपण्यास 'जेम्स वेब'ला यश आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news