Netflix Password : भारतातील Netflix यूजर्सची चिंता वाढली; ‘पासवर्ड शेअरिंग’बाबत कंपनीचा माेठा निर्णय

netflix
netflix

पुढारी ऑनलाईन: व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतात Netflix यूजर्सचा पासवर्ड शेअरिंग करण्यावर बंदी (Netflix Password) घालण्यात येणार असल्याचे नेटफ्लिक्सने म्हटले आहे. त्याची सुरुवात आजपासून म्हणजेच २० जुलैपासून झाली असून, कंपनीच्या या निर्णयामुळे भारतातील Netflix यूजर्सची चिंता वाढली आहे. यापूर्वी नेटफ्लिक्सने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये असा निर्णय लागू केला होता.

नेटफ्लिक्स ही व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कंपनी गेल्या काही दिवसांपासून सतत तोट्यात आहे. दरम्यान कंपनीने पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा हा मोठा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सच्या या निर्णयामुळे भारतात खळबळ माजणार हे नक्की; पण जे याशिवाय राहू शकत नाहीत त्यांना सबस्क्रिप्शन (Netflix Password) घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत कंपनीचे सक्रिय सदस्य वाढतील आणि महसूलही वाढेल. भारतात Netflix प्लॅनची ​​सुरुवातीची किंमत 149 रुपये आहे. टॉप प्लॅनची ​​किंमत ६४९ रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by India Today (@indiatoday)

नेटफ्लिक्सला त्याचे एक खाते एकाच घरातील अनेक लोक, जवळचे मित्र किंवा नातेवाईकांना यापुढे वापरता येणार नाही. असे केल्यास कंपनाकडून संबंधित नेटफिक्स यूजर्सची पडताळणी कंपनीकडून IP पत्ता, डिव्हाइस आयडी, नेटवर्क इत्यादीद्वारे केली जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त ऑपरेटींग डिव्‍हाइसवर एकच Netflix खाते वापरत असल्यास तुम्हाला एकच ईमेल मिळेल. Netflix प्लॅटफॉर्म वापरत असलेल्या युजर्सची दर सात दिवसांनी कोडद्वारे पडताळणी केली जाईल. याशिवाय, प्राथमिक खात्याचे वाय-फाय नेटवर्क 31 दिवसांतून एकदा तरी कनेक्ट (Netflix Password) करावे लागेल, असेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news