Neend app : शांत झोप हवी? मग ‘नींद’ ॲपवर गोष्ट ऐका

neend app
neend app
Published on
Updated on

Neend app : वाढता ताण-तणाव, धावपळ आणि बदलेली जीवनशैली यामुळे शांत झोप येणे कठीणच म्हणायला हवं. झोप येत नाही अशा तक्रारी अनेक पटींनी वाढलेल्या आहेत. पण आता तुम्हाला शांत झोप हवी असेल तर कुठेही जाण्याची किंवा झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. त्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये हवं नींद ॲप!! आयआयटी मुंबईमधून बीटेक केलेल्या सुरभी जैन या तरुणीने 'नींद' ॲपची निर्मिती केली. नींद ॲपवर तुम्ही हिंदी,मराठी, तमिळ, तेलगु आणि इंग्रजी भाषेत कथा, ध्यान धारणा तसेच संगीत ऐकू शकता आणि ते सुद्धा विनामूल्य !

लहानपणी झोपताना आजी किंवा आई गोष्ट सांगायची आणि गोष्ट ऐकताना आपल्याला कधी झोप लागायची ते कळतच नव्हतं. पण आपण मोठे झालो, हळूहळू सगळं बदललं आणि त्यात आजीची गोष्ट कुठेतरी हरवून गेली. तोच आनंद आपल्याला परत मिळावा, शांत झोप लागावी की जेणेकरून दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न आणि उत्साहात होईल याच उद्देशाने सुरभीने नींद ॲप सुरु केलं. सुरभी आणि तिच्या कुटुंबाला कोरोना झाला होता. सगळ्यांची झोप उडाली होती. त्यावेळी सुरभीला जाणीव झाली जे लोक सामान्यपणे झोपू शकत नाहीत त्यांना किती त्रास होत असेल. यासंदर्भात संशोधन केल्यावर समजलं शांत झोप येण्यासाठी उपायांची कमरता आहे आणि यातूनच 'नींद' ॲपचा जन्म झाला. https://neend.app/

गेल्या वर्षी सुरभीने यूट्यूबवर हिंदीमध्ये चॅनल सुरु केलं. तिथे सुरभीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोन -तीन महिन्यांनी 'नींद' ऍप सुरू केलं. आता यूट्यूबवरून लोकांना ॲपवर आणणं हे एक चॅलेंज होतं पण इच्छा तिथे मार्ग त्याचप्रमाणे सुरभी कामाला लागली. यूट्यूबवर गोष्ट ऐकणाऱ्या लोकांबरोबर संपर्क साधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक एक शक्कल लढवत नींद ॲप विकसीत केलं.

नींद ॲपवर मातृभाषेत गोष्टी ऐकण्यासोबत मेडिटेशन, मनाला शांतता देणार संगीतदेखील ऐकू शकता. कथा ऐकताना सुद्धा पौराणिक, ऐतिहासिक,लोककथा, प्रेरणादायक, नॉस्टॅलॅजिक असे पर्याय दिलेले आहेत. गोष्ट ऐकण्यापूर्वी मन कसं शांत करावं, कसं रिलॅक्स व्हावं ते सांगितलं जातं.गोष्ट ऐकताना कोणतीही जाहिरात तुम्हाला त्रास देत नाही. गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागते ते कळतच नाही. तज्ज्ञ, अनुभवी मंडळी, क्रिएटर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरभीची घोडदौड सध्या सुरू आहे.

सुरभी सांगते, 'सुरुवातीपासूनच मातृभाषेत गोष्ट सांगणे याकडे आम्ही भर दिला होता, कारण झोपताना मेंदू रिलॅक्स होणं गरजेच असतं. आपण जेव्हा मातृभाषेत कथा ऐकतो त्यावेळी ती पटकन आपल्याला कळते. अगदी शांतपणे आपण की ऐकत असतो, आपल्या मेंदूवर ताण पडत नाही आणि जेव्हा रिलॅक्सेशन आणि झोपेचा विषय येतो, तेव्हा लोक मातृभाषेतून ऐकणं पसंत करतात. युजर्सनी ॲपवरील कंटेंट मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये करण्याची मागणी केली होती. तेव्हा दीड महिन्यापासून 'नींद' ॲपवरील कंटेंट मराठीत उपलब्ध झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

'नींद' ॲपचं पुढचं पाऊल म्हणजे शांत झोपेसाठी स्लीप गमीज (टॉफी), मिल्क मिक्स, स्लीप टी अशी उत्पादने आणलेली आहेत. याचे सेवन केल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट तसेच त्याची सवय लागत नाही. जेव्हा कधी तुम्हाला वाटतंय झोप येत नाहीए. सकाळी खूप महत्त्वाचं काम आहे तुम्हाला ताजंतवानं वाटायला हवं तर एक गमीज रात्री तुम्ही घेवू शकता. ग्लूटेन फ्रि, सोया फ्री आणि शुद्ध शाकाहारी अशी ही उत्पादने आहेत. येत्या काळात रिलॅक्सेशन संदर्भात काही नवीन उत्पादने नींद ॲप घेवून येणार आहे. झोपेसह आता तणावमुक्त कसं जगता येईल यासाठी काही उत्पादने, मेडिटेशन यावर काम सुरु आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news